Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? घ्या जाणून तारखेसह महत्व

| Published : Jan 04 2025, 09:25 AM IST / Updated: Jan 04 2025, 09:29 AM IST

Bhogi 2025

सार

Bhogi 2025 : येत्या 13 जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. हा सण साजरा करण्यामागील कारण काय आणि यंदा कधी साजरा केला जाणार याबद्दल जाणून घेऊया…

Bhogi 2025 Importance and Date : 'न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की, भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते. यंदा भोगीचा सण येत्या  13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. 

भोगी साजरी करण्यामागील कारण

भोगी साजरा करण्यामागील कारण म्हणजे,  इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.

भोगी देणे म्हणजे काय ?

भोगीच्या दिवशी दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते. 

भोगी सण कसा साजरा केला जातो ?

भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी. या दिवशी राग, एखाद्याशी भांडण न करता सणाचा आनंद घ्यावा. दरम्यान, संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” तर आसाममध्ये ‘भोगली बिहू’ नावाने ओळखा जातो. पंजाबमध्ये ‘लोहिरी’, तर राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Makar Sankranti 2025 : यंदा 14 की 15 तारखेला संक्रांत? जाणून घ्या शुभ मुहूर्त

वर्ष 2025 मधील गृह प्रवेशासाठी वर्षभरातील शुभ तारखा, घ्या लिहून

Read more Articles on