उन्हाळ्यात ताजेपणा देणाऱ्या ७ भाज्या, खा आणि राहा थंड!
उन्हाळ्यात काकडी, टोमॅटो, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाज्या शरीराला थंडावा देतात, हायड्रेट ठेवतात आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.
- FB
- TW
- Linkdin
)
काकडी, उन्हाळ्यातील नैसर्गिक हायड्रेशन
काकडीमध्ये ९५% पाणी असते. ही भाजी शरीराला हायड्रेट ठेवते, पाचन सुधारते आणि त्वचेचं आरोग्यही राखते.
टोमॅटो, ताजेपणाचा रस
टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C भरपूर असतात. उन्हाळ्यात टोमॅटो रसाने मिळतो थंडावा आणि आतून बाहेरून चमक!
दुधी भोपळा, हलकी व थंडावा देणारी भाजी
दुधी पचनासाठी उत्तम आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुपरफूड! शरीरातील पाणी कमी होऊ देत नाही.
शिमला मिरची, रंग, स्वाद आणि फायदे
व्हिटॅमिन C ने भरपूर शिमला मिरची शरीराला थंड ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
पालक, उन्हाळ्यातील हिरवी शक्ती
पालक हे आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण. उन्हाळ्यात रक्तशुद्धीसाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी उत्तम.
गाजर, थंडावा आणि पोषण एकत्र
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबर भरपूर. उन्हाळ्यात त्वचेला आणि पचनाला फायदेशीर!
वांगी, पचनासाठी हलकी भाजी
वांगी ही उन्हाळ्यासाठी उपयुक्त आणि हलकी भाजी आहे. शरीरात उष्णता वाढू देत नाही.
उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘ह्या’ सोप्या टीप्स
उन्हाळ्यात २–३ लिटर पाणी प्या, तेलकट पदार्थ टाळा आणि पाण्याने भरलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा!