MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Dal Cooking Tips : डाळीतील पोषण टिकवून ठेवायचंय? मग डाळ शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Dal Cooking Tips : डाळीतील पोषण टिकवून ठेवायचंय? मग डाळ शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

डाळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन आणि पोषक घटक डाळीतून मिळतात. पण हे सगळे घटक शरीराला मिळण्यासाठी डाळ कशी शिजवावी आणि कशी खावी, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 04 2026, 02:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
डाळ कशी शिजवावी?
Image Credit : AI

डाळ कशी शिजवावी?

भारतीय जेवणात डाळीशिवाय ताट अपूर्णच वाटतं. तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ अशा अनेक डाळींचा आपण रोजच्या जेवणात समावेश करतो. डाळीमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आणि भरपूर प्रोटीन असतं. पण हे सगळे घटक शरीराला मिळण्यासाठी आपण डाळ कशी शिजवतो, हे खूप महत्त्वाचं आहे. डाळीतील पोषण वाया जाऊ नये म्हणून ती कशी शिजवावी? तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात ते पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
डाळ भिजत घालणे...
Image Credit : AI meta

डाळ भिजत घालणे...

अनेक जण डाळ थेट कुकरमध्ये शिजायला लावतात. पण डाळीतील पूर्ण पोषण मिळवण्यासाठी ती शिजवण्यापूर्वी किमान २ तास भिजत ठेवणं गरजेचं आहे. डाळ भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ॲसिडसारखे अँटी-न्यूट्रिएंट्स निघून जातात. यामुळे आपली पचनसंस्था डाळीतील प्रोटीन चांगल्या प्रकारे शोषून घेते. तसेच पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होत नाही.

डाळ भिजवलेले पाणी फेकून देऊ नका...

डाळ भिजवण्यापूर्वी ती ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर ती चांगल्या पाण्यात भिजत ठेवा. अनेक जण डाळ भिजवलेले पाणी फेकून देतात, पण ही चूक करू नका. डाळ पाण्यात भिजते तेव्हा त्यातील व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी त्या पाण्यात उतरतात. ते पाणी फेकून दिल्यास सगळी जीवनसत्त्वे वाया जातात. त्यामुळे डाळ शिजवताना तेच पाणी वापरा, जेणेकरून पोषण सुरक्षित राहील.

Related Articles

Related image1
Toor Dal vs Masoor Dal : तूर डाळ की मसूर डाळ? आरोग्यासाठी कोणती डाळ जास्त फायदेशीर?
Related image2
Protein Rich Foods : शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा बेस्ट सोर्स कोणती डाळ? कशात किती प्रोटीन असतं?
33
डाळीतील पोषण दुप्पट करण्यासाठी...
Image Credit : gemini ai

डाळीतील पोषण दुप्पट करण्यासाठी...

पॉलिश न केलेल्या डाळींना पसंती द्या: चकचकीत दिसणाऱ्या डाळी पाहून फसू नका. कृत्रिम पॉलिश केलेल्या डाळींपेक्षा सेंद्रिय किंवा अनपॉलिश्ड डाळींमध्ये नैसर्गिक पोषण आणि फायबर जास्त असते.

दर्जाशी तडजोड नको: जास्त प्रोटीन, कमी फॅट आणि आवश्यक पोषक घटक देणाऱ्या चांगल्या दर्जाच्या डाळींची निवड करा.

डाळी मिक्स करून शिजवा: रोज एकच डाळ खाण्याऐवजी तूरडाळ, मूगडाळ आणि उडीदडाळ एकत्र करून शिजवा. यामुळे शरीराला विविध प्रकारचे अमिनो ॲसिड आणि पोषण मिळते.

जेवणात विविधता आणा: फक्त वरण-भात खाण्यावर थांबू नका. डाळींचे सॅलड, स्नॅक्स, डाळीचे डोसे किंवा पोळीच्या पिठात डाळ मिसळून नवीन पदार्थ तयार करा. डाळीपासून तुम्ही अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता. यामुळे तुम्हाला डाळीतील सर्व पोषण मिळेल आणि तुम्ही निरोगी राहाल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Mercury Transit : या 5 राशींचे नशीब उजळणार, पुढचे 22 दिवस मिळणार बक्कळ पैसा
Recommended image2
Dhanteras Shopping : धनत्रयोदशीला या वस्तू घरी आणा, लक्ष्मीची कृपा नक्की होईल
Recommended image3
Morning Routine : सकाळी ब्रश न करता पाणी पिताय? मग हे नक्की वाचा
Recommended image4
Snow Destinations In November : नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायचीय? या ५ स्वस्त ठिकाणांना नक्की भेट द्या
Recommended image5
Dhanteras 2026 : धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तूंचं नेमकं काय करायचं?
Related Stories
Recommended image1
Toor Dal vs Masoor Dal : तूर डाळ की मसूर डाळ? आरोग्यासाठी कोणती डाळ जास्त फायदेशीर?
Recommended image2
Protein Rich Foods : शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा बेस्ट सोर्स कोणती डाळ? कशात किती प्रोटीन असतं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved