Beauty Tips: गुलाब पाणी चेहऱ्यावरील लाल डाग कमी करण्यास देखील मदत करते. कारण त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म यासाठी उपयुक्त ठरतात. याच्या नियमित वापराने त्वचेची चमक परत येते. बेसन, कोरफड किंवा हळद यांमध्ये गुलाब पाणी मिसळून फेस पॅक म्हणून वापरता येतो

Beauty Tips: फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहीत असलेले फूल म्हणजे गुलाब. जगभर गुलाबाच्या 150 हून अधिक जाती असून फुलांमध्ये विविध रंग आढळतात. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तेल असते. त्यापासून अत्तर तयार करतात. तेल मिळविण्यासाठी पाकळ्यांमधून वाफ सोडतात. तेल काढून घेऊन मागे उरलेले पाणी गुलाबपाणी म्हणून वापरतात. हे पाणी देखील औषधी असून त्वचेसाठी ते अतिशय उपयुक्त ठरते. गुलाब पाण्याचा वापर तेलकट त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरतो. या पाण्याचे तीन प्रकारे कसा उपयोग करता येतो ते या लेखात जाणून घेऊया.

त्वचेची चमक सुधारण्यासाठी गुलाब पाणी हा एक उत्तम घटक आहे. गुलाब पाणी एक नैसर्गिक टोनर आहे. हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्यास मदत करते, तसेच त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यासही मदत करते. 

गुलाब पाण्याच्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेची जळजळ आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो. नियमितपणे चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने त्वचेची चमक परत मिळण्यास मदत होते.

लाल डाग कमी करण्यासाठी देखील गुलाब पाणी मदत करते. कारण त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म यासाठी उपयुक्त ठरतात. गुलाब पाण्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील लाल डागांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि अनावश्यक डागांना कारणीभूत असलेली घाण काढून टाकण्यासाठी गुलाब पाणी योग्य आहे.

गुलाब पाणी वापरण्याची पद्धत

एक

दोन चमचे गुलाब पाण्यात थोडे बेसन मिसळून पॅक बनवा. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. तो पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा सुंदर बनवण्यासाठी हा पॅक उत्तम आहे.

दोन

गुलाब पाणी आणि कोरफडीचा गर एकत्र करून पॅक बनवा. त्यानंतर हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटे तसाच ठेवा. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हा पॅक मदत करेल.

तीन

दोन चमचे हळद पावडर आणि थोडे गुलाब पाणी एकत्र करून पॅक बनवा. त्यानंतर हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा.