Beauty Tips : मॅट लिपस्टिक वापरण्याच्या 5 स्मार्ट टिप्स, ओठांचे खुलेल सौंदर्य
Beauty Tips : मॅट लिपस्टिक योग्य पद्धतीने वापरली तर ओठ अधिक स्मूथ, भरदार आणि आकर्षक दिसू शकतात. ओठांची तयारी, लिप लाइनरचा वापर, ब्रशने लावणे, ब्लॉटिंग आणि योग्य शेड निवडणे. पाहा काही टिप्स…

मॅट लिपस्टिकचा वापर
मॅट लिपस्टिक हा आजच्या मेकअप ट्रेंडमधील सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. दीर्घकाळ टिकणारी, स्मज न होणारी आणि एलिगंट लूक देणारी मॅट लिपस्टिक अनेक महिलांची पहिली पसंती असते. मात्र योग्य पद्धतीने मॅट लिपस्टिक न लावल्यास ओठ कोरडे दिसणे, रेषा उठून दिसणे किंवा लिपस्टिक पॅची दिसण्याची समस्या निर्माण होऊ शकते. काही स्मार्ट टिप्स वापरल्या तर मॅट लिपस्टिक लावल्यानंतर ओठ अधिक स्मूथ, भरदार आणि आकर्षक दिसू शकतात. चला जाणून घेऊया मॅट लिपस्टिक वापरण्याच्या 5 स्मार्ट टिप्स.
ओठांची योग्य तयारी (Lip Prep) करा
मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांची तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. ओठांवर मृत त्वचा साचलेली असेल तर मॅट लिपस्टिक नीट बसत नाही आणि रेषा अधिक उठून दिसतात. आठवड्यातून 2 वेळा सौम्य लिप स्क्रब वापरून ओठ एक्सफोलिएट करा. यानंतर लिप बाम लावून किमान 10 मिनिटे ठेवावा. अतिरिक्त बाम टिश्यूने हलक्या हाताने पुसून टाका, म्हणजे ओठ हायड्रेटेड राहतील पण चिकट वाटणार नाहीत.
लिप लाइनरचा स्मार्ट वापर करा
मॅट लिपस्टिक परफेक्ट दिसण्यासाठी लिप लाइनरचा वापर खूप महत्त्वाचा असतो. ओठांच्या नैसर्गिक आकारानुसार लाइनरने आउटलाइन केल्यास लिपस्टिक पसरत नाही आणि ओठ भरदार दिसतात. ओठांच्या कडेला थोडं ओव्हरलाइन केल्यास ओठ मोठे आणि आकर्षक दिसू शकतात. लाइनरने संपूर्ण ओठ हलक्याने भरल्यास मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते.
ब्रशने लावा मॅट लिपस्टिक थेट
स्टिकमधून लिपस्टिक लावण्याऐवजी लिप ब्रशचा वापर केल्यास अधिक अचूक आणि स्मूथ फिनिश मिळतो. ब्रशमुळे लिपस्टिक ओठांच्या प्रत्येक कोपऱ्यात नीट बसते आणि लेयर्स कंट्रोल करता येतात. दोन हलक्या लेयर्समध्ये लिपस्टिक लावल्यास ओठ कोरडे न दिसता अधिक नैसर्गिक मॅट लूक मिळतो.
ब्लॉटिंग आणि सेटिंग ट्रिक वापरा
लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपरने ओठ हलक्याने ब्लॉट करा. यामुळे अतिरिक्त प्रॉडक्ट निघून जातं आणि लिपस्टिक अधिक सेट होते. यानंतर थोडंसं ट्रान्सल्युसंट पावडर ब्रशने किंवा टिश्यूच्या वरून ओठांवर टॅप केल्यास मॅट लिपस्टिक जास्त काळ टिकते आणि ओठांवरील रेषा कमी दिसतात.
योग्य शेड आणि फॉर्म्युला निवडा
प्रत्येक मॅट लिपस्टिक सारखी नसते. अतिशय ड्राय फॉर्म्युला ओठांच्या रेषा ठळक करतो. त्यामुळे क्रीमी मॅट किंवा हायड्रेटिंग मॅट फॉर्म्युला निवडणे चांगले. तुमच्या स्किन टोनला साजेसा शेड निवडल्यास ओठांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. न्यूड, रोज, माउव्ह किंवा बेरी शेड्स रोजच्या वापरासाठी उत्तम ठरतात.

