MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Beauty Mistakes : महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरुनही चेहरा काळपट दिसतो? तर तुम्ही करतायत या चुका

Beauty Mistakes : महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरुनही चेहरा काळपट दिसतो? तर तुम्ही करतायत या चुका

Beauty Mistakes : महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरूनही चेहरा काळपट दिसण्यामागे चुकीची स्किन केअर, सनस्क्रीनचा अभाव, जास्त प्रोडक्ट्सचा वापर, अस्वस्थ लाईफस्टाईल आणि अपुरी स्वच्छता ही मुख्य कारणे आहेत. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Dec 27 2025, 02:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मेकअप करताना करू नका चुका
Image Credit : storyblocks

मेकअप करताना करू नका चुका

आजकाल त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. ब्रँडेड क्रीम्स, सीरम्स, फेसवॉश असूनही अनेकांची तक्रार असते की चेहरा उजळण्याऐवजी अधिकच काळपट, निस्तेज दिसू लागतो. यामागे प्रोडक्ट्सपेक्षा तुमच्या दैनंदिन स्किन केअर सवयी कारणीभूत असू शकतात. नकळत केल्या जाणाऱ्या काही चुका त्वचेचं नैसर्गिक तेज हिरावून घेतात. त्यामुळे महागडे प्रोडक्ट्स वापरूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.

26
स्किन टाइपनुसार प्रोडक्ट्स न वापरणे
Image Credit : Getty

स्किन टाइपनुसार प्रोडक्ट्स न वापरणे

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते – कोरडी, तेलकट, मिश्र किंवा संवेदनशील. मात्र अनेक जण मित्रांच्या सल्ल्याने किंवा जाहिराती पाहून कोणतेही प्रोडक्ट वापरतात. स्किन टाइपनुसार योग्य प्रोडक्ट न वापरल्यास त्वचेवर रॅशेस, डलनेस आणि काळपटपणा वाढतो. विशेषतः तेलकट त्वचेवर जड क्रीम वापरल्यास पोर्स बंद होतात आणि चेहरा अधिक काळा दिसू लागतो.

Related Articles

Related image1
Skin Care : थंडीत पुदीन्याचा या पद्धतीने वापर करून खुलवा चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा टिप्स
Related image2
Hair Spa at Home : घरच्याघरी असा करा हेअरस्पा, डोक्याला मिळेल संपूर्ण आराम
36
सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करणे
Image Credit : freepik

सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करणे

महागडी क्रीम्स लावूनही जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल, तर सगळी मेहनत वाया जाते. सूर्याच्या UV किरणांमुळे टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि त्वचेचा रंग बदलतो. अनेकांना वाटतं की घराबाहेर कमी जातो म्हणून सनस्क्रीनची गरज नाही, पण ही मोठी चूक आहे. रोज सनस्क्रीन न लावल्यास चेहरा हळूहळू काळपट आणि थकलेला दिसू लागतो.

46
जास्त प्रोडक्ट्स एकत्र वापरणे
Image Credit : unsplash

जास्त प्रोडक्ट्स एकत्र वापरणे

अधिक प्रोडक्ट्स म्हणजे चांगले परिणाम, असा गैरसमज अनेकांचा असतो. एकाच वेळी अनेक सीरम, क्रीम आणि फेस पॅक वापरल्याने त्वचेवर रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. यामुळे त्वचा संवेदनशील होते आणि तिचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. साधी आणि योग्य स्किन केअर रूटीन ठेवली नाही, तर चेहरा निस्तेज दिसण्याची शक्यता वाढते.

56
त्वचा स्वच्छ न ठेवणे
Image Credit : unsplash

त्वचा स्वच्छ न ठेवणे

दिवसभर धूळ, माती आणि प्रदूषण त्वचेवर साचते. योग्य प्रकारे चेहरा स्वच्छ न केल्यास पोर्समध्ये घाण साठते आणि त्वचा काळपट दिसू लागते. मेकअप काढल्याशिवाय झोपणे ही सुद्धा मोठी चूक आहे. नियमित क्लिन्झिंग न केल्यास महागडी प्रोडक्ट्सही निष्प्रभ ठरतात.

66
चुकीची लाईफस्टाईल आणि डाएट
Image Credit : Asianet News

चुकीची लाईफस्टाईल आणि डाएट

फक्त बाह्य सौंदर्यप्रसाधनांवर अवलंबून राहून चालत नाही. अपुरी झोप, पाणी कमी पिणे, जंक फूडचे जास्त सेवन आणि ताणतणाव याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसतो. शरीर आतून अस्वस्थ असेल, तर कितीही महागडे प्रोडक्ट्स वापरले तरी चेहरा काळपट आणि थकलेला दिसतो.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Horoscope 4th March : चंद्र बदलणार रास, ग्रहण योग संपणार; मेष-कर्कसह या ५ राशींसाठी दिवस शुभ
Recommended image2
Gold Bali: रिच आणि एलिगेंट लूकसाठी, डायमंड ड्रॉप्स असलेल्या बालीचे 5 लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image3
Natural Holi Colors: होळीसाठी गुलाबी रंग कसा बनवायचा? हे 5 पर्याय आहेत 100% नॅचरल
Recommended image4
Cotton Blend Saree: महिला दिनी दिसा कूल, टीचर्ससाठी 7 कॉटन ब्लेंड साडी डिझाइन्स
Recommended image5
Sun Earrings: गोल्डन ग्लोचा जबरदस्त लुक! 22KT सोन्यात बनवा सूर्याच्या डिझाइनचे 7 इअररिंग्स
Related Stories
Recommended image1
Skin Care : थंडीत पुदीन्याचा या पद्धतीने वापर करून खुलवा चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा टिप्स
Recommended image2
Hair Spa at Home : घरच्याघरी असा करा हेअरस्पा, डोक्याला मिळेल संपूर्ण आराम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved