Vastu Tips: या दिशेला डस्टबिन ठेवताय ? एक चूक तुम्हाला करू शकते कंगाल

| Published : May 30 2024, 05:29 PM IST

woman-throwing-wasted-food-into-steel-bin

सार

आपल्या सर्वांच्या घरात कचरा टाकण्यासाठी डस्टबिन असतातच. अशा परिस्थितीत ते कोणत्या दिशेला ठेवावे हे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

वास्तुशास्त्रावर तुमचा विश्वास आहे ना ! मग यानुसार घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तुंना वेगळे महत्व आहे. असे म्हटले जाते की जर तुम्ही तुमच्या घरात कोणतीही वस्तू तिच्या योग्य ठिकाणी ठेवली तर ते खूप शुभ आणि सकारात्मक परिणाम देते. त्याच वेळी, जेव्हा वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम नकारात्मक होतात.आज आम्ही तुम्हाला घराच्या सर्वात सामन्य असल्या सामानाविषयी सांगणार आहोत, ती म्हणजे डस्टबिन. ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या घरातील डस्टबिन कुठे ठेवावा आणि त्याच्याशी संबंधित कोणत्या चुका करू नयेत. यासाठी वाचा सविस्तर...

डस्टबिनची योग्य दिशा कोणती ?

घरामध्ये डस्टबिन कोणत्या दिशेला ठेवावा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल. तर वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. या दिशेला डस्टबिन ठेवल्यास त्याचा तुमच्या घरावर आणि जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. असे म्हणतात की डस्टबिन या दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जा वाहू लागतात आणि धन दौलतीची भरभराटी होते.

चुकूनही या दिशेला ठेवू नका डस्टबिन :

जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही कधीही घराच्या ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवू नये. असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. या दिशेला डस्टबिन न ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे ही दिशा देवी-देवतांची दिशा असल्याचे सांगितले गेले आहे.त्याचबरोबर डस्टबिन या दिशेला ठेवल्यास घरातील सदस्य नेहमी मानसिक त्रासात राहतात. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही दक्षिण-पूर्व, पूर्व आणि उत्तर दिशेने डस्टबिन ठेवू नये. असे केल्यास लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.

डस्टबिन पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवू नका :

वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये निराशा पसरू लागते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा विकास खुंटतो. यासोबतच उत्तर दिशेला ठेवलेल्या डस्टबिनमुळे नोकरी आणि करिअरच्या चांगल्या संधी कमी होऊ शकतात.

आणखी वाचा :

प्रेमानंद महाराज : पालकांच्या कृतीचे परिणाम मुलांना भोगावे लागतात का ?

Vastu Tips :घरात शूज आणि चप्पल कुठे ठेवले पाहिजे ? कुठे नाही ?