- Home
- lifestyle
- April Fool Day 2026: मित्रांना बनवायचंय 'एप्रिल फूल'? पाठवा हे भन्नाट मराठी जोक्स आणि मेसेज!
April Fool Day 2026: मित्रांना बनवायचंय 'एप्रिल फूल'? पाठवा हे भन्नाट मराठी जोक्स आणि मेसेज!
April Fool Day 2026: दरवर्षी १ एप्रिलला 'एप्रिल फूल डे' साजरा केला जातो, ज्या दिवशी लोक एकमेकांची फिरकी घेतात. या लेखात मित्र, नातेवाईकांना पाठवण्यासाठी काही जबरदस्त आणि मजेशीर 'एप्रिल फूल' मेसेज दिलेत, जे वापरून तुम्ही त्यांना सहज मूर्ख बनवू शकता.

मित्रांना बनवायचंय 'एप्रिल फूल'?
मुंबई: दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात 'मूर्ख दिन' म्हणजेच April Fool's Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणाची तरी फिरकी घेणे, हलकी-फुलकी मस्करी करणे आणि खोटी बातमी देऊन समोरच्याला 'एप्रिल फूल' म्हणण्यात एक वेगळीच मजा असते. तुमच्या लाडक्या मित्रांना आणि नातेवाईकांना चिडवण्यासाठी खालील मेसेज नक्की वापरा!
जबरदस्त 'एप्रिल फूल' मेसेज
सत्य १: तुम्ही तुमची जीभ खालच्या ओठाला लावू शकत नाही.
सत्य २: हे वाचल्यानंतर आता तुम्ही नक्कीच तसा प्रयत्न केला असणार!
Happy April Fool’s Day!
मूर्खांचा राजा
मूर्खांच्या या पावन आणि पवित्र उत्सवाच्या दिवशी, 'मूर्खांचे सरताज' असणाऱ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा! तुमचा दिवस आनंदाचा जावो.
कोणासाठी कोणता दिवस?
२ ऑक्टोबर : गांधीजींसाठी,
१४ नोव्हेंबर : नेहरूंसाठी,
१५ ऑगस्ट : देशासाठी,
आणि १ एप्रिल : खास तुझ्यासारख्यासाठी!
Enjoy Your Day!
मोफत सल्ला
जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत राहा, जर कुणी माकड म्हटलं तरी हसून सोडून दे... पण जर चुकून कुणी तुला 'स्मार्ट' म्हटलं, तर मात्र सणसणीत थोबाडीत दे त्याच्या... कारण आज एप्रिल फूल आहे!
प्रेमाची 'रिस्क'
वेडे आहेत ते लोक जे १४ फेब्रुवारीला प्रपोज करतात... हिंमत असेल तर १ एप्रिलला प्रपोज करून बघा! मान्य केलं तर 'कुल' आणि नाही म्हणाली तर 'एप्रिल फूल' म्हणता येतं!
तुझी स्तुती
तू दिसायला खूप देखणा आहेस, तुझी बुद्धी खूप तल्लख आहे आणि तू खूप प्रामाणिक आहेस... हे सगळं मी खरं बोललो असतो, जर आज १ एप्रिल नसता! Happy April Fool!
गुलाब आणि मेंढरू
चेहरा तुमचा एखाद्या टवटवीत गुलाबासारखा आहे, आवाज तुमचा एखाद्या कोकिळेसारखा आहे, पण डोकं मात्र एखाद्या मेंढरासारखं आहे! एप्रिल फूल!

