MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Almond Oil Benefits : चेहऱ्यावर ग्लो नाही? डोळ्यांखाली काळी वर्तुळं, सुरकुत्यांनी हैराण? तेलाचे 2 थेंब पुरेसे आहेत

Almond Oil Benefits : चेहऱ्यावर ग्लो नाही? डोळ्यांखाली काळी वर्तुळं, सुरकुत्यांनी हैराण? तेलाचे 2 थेंब पुरेसे आहेत

तुमची त्वचा कोरडी झाली आहे आणि चेहऱ्यावरचा ग्लो गेलाय का? डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सुरकुत्यांचा त्रास होतोय? मग रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे फक्त २ थेंब चेहऱ्याला लावून मसाज करून बघा.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 11 2026, 02:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
काय फायदे मिळतात?
Image Credit : our own

काय फायदे मिळतात?

मुंबई : बदलत्या हवामानामुळे त्वचा कोरडी (ड्राय) होऊ लागते. यावर उपाय म्हणून चेहऱ्याला बदामाच्या तेलाने (Almond Oil) थोडा वेळ मसाज करणं खूप फायदेशीर ठरतं. चला, जाणून घेऊया बदामाचं तेल चेहऱ्याला लावल्याने कोणते फायदे मिळतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवते
Image Credit : our own

चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवते

तुमची त्वचा खूप कोरडी, निस्तेज आणि निर्जीव दिसत असेल, तर तिला अधिक पोषणाची गरज आहे. यासाठी रोज चेहऱ्याला बदामाच्या तेलाने मसाज करा. बदामाचं तेल त्वचेसाठी खूप हलकं (Lightweight) आणि फायदेशीर असतं. हे तेल त्वचेला खोलवर पोषण देतं आणि चेहरा नेहमी हायड्रेटेड (Hydrated) ठेवतं.

Related Articles

Related image1
Sleeping Tips : रात्री शांत झोप लागत नाहीये? मग हे सोपे उपाय करून बघाच
Related image2
Soaked Almonds : भिजवलेले बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतील दूर
36
यामध्ये आहे कमी चिकटपणा
Image Credit : our own

यामध्ये आहे कमी चिकटपणा

कोरड्या त्वचेसाठी बदामाचं तेल एक उत्तम उपाय आहे. इतर तेलांच्या तुलनेत हे कमी चिकट असतं. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन 'ई', फॅटी ॲसिड (Fatty Acids) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला मुलायम, गुळगुळीत आणि चमकदार ठेवतात.
46
संवेदनशील त्वचेचे लोकही वापरू शकतात
Image Credit : our own

संवेदनशील त्वचेचे लोकही वापरू शकतात

डोळ्यांखालील काळी वर्तुळं (Dark Circles) किंवा सूज कमी करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करता येतो. ज्यांची त्वचा संवेदनशील (Sensitive Skin) आहे, त्यांच्यासाठीही हे तेल खूप चांगलं आहे. आंघोळीनंतर बदामाचं तेल लावल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
56
उन्हामुळे त्वचा काळी पडल्यास
Image Credit : others

उन्हामुळे त्वचा काळी पडल्यास

चेहऱ्यावरील टॅनिंग (उन्हामुळे काळवंडलेली त्वचा) कमी करण्यासाठी रोज बदामाच्या तेलाने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. यातील व्हिटॅमिन 'ई' फाईन लाईन्स (Fine lines) आणि सुरकुत्या (Wrinkles) कमी करण्यास मदत करते.
66
त्वचा नेहमी चमकेल
Image Credit : google

त्वचा नेहमी चमकेल

बदामामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणारे पोषक घटक असतात. तुमची त्वचा खूपच खडबडीत (Rough skin) झाली असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने मसाज करा. हातावर फक्त २ थेंब तेल घेऊन संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे तुमची त्वचा नेहमी चमकदार आणि तजेलदार दिसेल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी कॉफीचे 5 सोपे ब्युटी हॅक्स
Recommended image2
Cardamom Water : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?
Recommended image3
Gold Jhumka Designs : सिल्क साड्यांवर शोभून दिसतील असे सुंदर झुमके
Recommended image4
Antique Gold Bangles : हातांना रॉयल लूक देणाऱ्या अँटिक गोल्ड आणि मोत्यांच्या बांगड्या
Recommended image5
DMart Carry Bag : डीमार्टमध्ये कॅरी बॅगसाठी पैसे देताय? हा निकाल नक्की वाचा
Related Stories
Recommended image1
Sleeping Tips : रात्री शांत झोप लागत नाहीये? मग हे सोपे उपाय करून बघाच
Recommended image2
Soaked Almonds : भिजवलेले बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतील दूर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved