सार

वॅक्सिंग केल्यानंतर बहुतांश महिलांची त्वचा कोरडी होते. या समस्येवर काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. जेणेकरुन त्वचा आधीसारखी हेल्दी राहण्यास मदत होईल.

After Waxing Skin Care Tips : त्वचेवरील अनवॉन्टेड केस काढण्यासाठी पार्लर किंवा घरच्याघरी वॅक्सिंग केले जाते. पण वॅक्सिंग केल्यानंतर बहुतांश महिलांची त्वचा कोरडी किंवा लाल चट्टे आल्यासारखी होते. खरंतर, वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवरील डेड स्किन दूर होते. यामुळे त्वचेमधील ओलरसपणा कमी होतो. वॅक्सिंग केल्यानंतर योग्य प्रकारे त्वचेची काळजी न घेतल्यास समस्या अधिक वाढली जाऊ शकते. जाणून घेऊया वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा मऊसर राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल सविस्तर...

एलोवेरा जेलचा वापर

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर एलोवेरा जेलचा वापर करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळण्यास मदत होईल. वॅक्सिंगनंतर त्वचा लाल होणे, जळजळ होणे किंवा कोरड्या त्वचेची समस्या एलोवेरा जेलमुळे कमी होईल.

थंड पाण्याचा वापर

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा गरम पाण्याएवजी थंड पाण्याने धुवा. जेणेकरुन त्वचेला आराम मिलेल. थंड पाण्याने त्वचा धुतल्याने रेडनेस किंवा खाज येण्याची समस्या दूर होईल.

हेही वाचा : नाइट स्किन केअरसाठी 5 नियम, वयाच्या 45 व्या वर्षीही दिसाल तरुण

हाइड्रेट रहा

त्वचेमधील ओलसरपणा कायम राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा आतमधून ओलसरही राहिल.

नारळाच्या तेलाचा वापर

नारळाचे तेल नैसर्गिक मॉइश्चराइजरच्या रुपात काम करते. वॅक्सिंग केल्यानंतर हातापायांना नारळाच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होईल.

वॅक्सिंगनंतर या गोष्टींची घ्या काळजी

  • वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर परफ्यूम, डियोड्रेंट किंवा केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करणे टाळा.
  • अधिक गमर पाण्याने त्वचा धुण्याएवजी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा.
  • वॅक्सिंग केल्यानंतर अधिक घट्ट वस्र परिधान करणे टाळा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

त्वचेसाठी 'या' बिया आहेत फायदेशीर, असा करा वापर

दररोज दही खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे