सार

गणपती उत्सवाची सुरुवात आनंदात होते पण त्याची सांगता मात्र दुःखाची होते. कोकणात तर गणपतीसाठी जगभरातून लोक येतात आणि हा क्षण असाच कायमचा राहावा असे सर्वांना वाटते.

गणपती बसल्यानंतर सगळीकडं उत्साह दिसून येतो पण तो उठायच्या वेळी मात्र दुःखाची झालर पसरून जाते. कोकणात तर गणपती उत्सवाच्या काळात जगात सगळीकडून लोक तिथं येतात. गणपतीचा क्षण असाच राहावा असं वाटतं सर्वांना वाटतं. एक्स या प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये गणपतीचा क्षण तसाच राहावा असं वाटत. 

जसाच्या तसा तिथंच्या तिथं थांबला पाहिजे - 
तो एक एक क्षण, जसाच्या तसा तिथंच्या तिथं थांबला पाहिजे. पण नाही होत तसं..गणपतीच म्हणतो.. चल मी निघतो पुढच्या वर्षी येतो, तू पण जा आता चालत रहा! असा कॅप्शन वैभव शेटकर यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे. वैभव शेटकर यांनी गणपतीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी कोकणामधून जाणाऱ्या रेल्वेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

कोकणात गणपती आणि गौरी यांची मोठी क्रेझ आहे. जगात कोकणी माणूस कुठंही असला तरीही तो गणपतीत गावाला जातो. काही ठिकाणी कोकणात २१  दिवसांचा गणपती बसवला जाते. गणपतीमध्ये कोकणात आपणही जाऊन यायला हवं, येथे जाऊन आपण उकडीचे मोदक आनंद घेऊ शकता.