सार

सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक परदेशी नागरिक गणपतीची आरती म्हणत आहे. गोमंतकीय पद्धतीने गणपती बसवल्यानंतर ही आरती म्हटली जाते.

महाराष्ट्रात गणपतीचं सगळ्यात जास्त क्रेझ असल्याचं दिसून येत. येथील कोकण भागात गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी या ठिकाणी जगभरात असलेला कोकणी माणूस हजर राहत असल्याचं दिसून येत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक परदेशी नागरिक आरती म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. 

परदेशी नागरिकाने म्हटली आरती - 
परदेशी नागरिकाने यावेळी आरती म्हटल्याचे दिसून आलं आहे. गोमंतकीय संस्कृती गोवा आणि कोकणी भागात दिसून येते. या पद्धतीमध्ये गणपती बसवल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रीती आणि रिवाज दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गणपती बसवल्यानंतर घुमट आरती म्हटले जाते. या आरतीमुळे गोमंतकीय संस्कृती सगळीकडं दिसून येत असते. यावेळी एक परदेशी नागरिक ही आरती म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. 

वागुर्मे-फोंड्यातील नाईकांच्या घरातील गणपतीला एक परदेशी पाहुणा त्यात सामील झाला असून त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यावर बाकी लोकांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत. त्यांनी कमेंट करताना म्हटले आहे की, आम्हाला सुरुवातीला हेडन वाटला. हेडन हा ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपट्टू आहे. काहींनी यावर गणपतीची आराधना केल्याबद्दल गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आहे.