घरात धावत्या घोड्यांचे या दिशेला लावा फोटो, आयुष्यात येईल सकारात्मकता

| Published : Dec 27 2024, 12:06 PM IST / Updated: Dec 27 2024, 12:08 PM IST

Ideal direction for 7 horses painting
घरात धावत्या घोड्यांचे या दिशेला लावा फोटो, आयुष्यात येईल सकारात्मकता
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वास्तुनुसार, घरात 7 धावत्या घोड्यांचे फोटो लावणे सकारात्मक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा आणि समृद्धी येते. अशातच धावत्या घोड्यांचे फोटो घरात कोणत्या दिशेला आणि कोणत्या प्रकारचे लावावेत याबद्दल जाणून घेऊया.

7 Running Horse Painting Vastu Direction : घरामध्ये सात धावत्या घोड्यांचा फोटो लावणे शुभ असण्यासह आयुष्यात सकारात्मकता आणि उन्नती घेऊन येतात. बहुतांश घरात, दुकानात आणि ऑफिसमध्ये सात धावत्या घोड्यांचे फोटो लावले जातात. या फोटोबद्दल अशी मान्यता आहे की, यामुळे आयुष्य, नोकरी आणि व्यवसायात वाढ, समृद्धी येते.

योग्य दिशांची निवड

सात धावत्या घोड्यांचा फोटो घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. या दिशा धन, समृद्धी आणि सकारात्मक उर्जा आकर्षित करते. याशिवाय पश्चिम आणि दक्षिण दिशेला धावत्या घोड्यांचा फोटो लावणे टाळा. यामुळे नकारात्मक उर्जा वाढली जाऊ शकते.

फोटोचे महत्व

सात धावत्या घोड्यांमुळे गती, शक्ती आणि स्थिरता असे दर्शवले जाते. वास्तुमध्ये सात धावत्या घोड्यांचा फोटो असणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण 7 अंक समृद्धी आणि यशाकडे दर्शवला जातो.

फोटोचे योग्य स्वरुप

धावते घोडे पूर्ण उर्जेसह शक्तीबळ दाखवत असल्याचे असावेत. फोटोमध्ये होणारा सुर्योदय असावा. असा फोटो शुभ मानला जातो. याशिवाय घोड्यांचे चेहरे स्पष्ट आणि समोरच्या बाजूला असावे.

स्थानाची निवड

फोटो घरातील ड्रॉइंग रुम, लिव्हिंग रुम किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ लावा. या ठिकाणाहून उर्जेचा सकारात्मक प्रवाह येत राहतो.

लावण्याची पद्धत

सात धावत्या घोड्यांचा फोटो नेहमीच डोळ्यांच्या समान भिंतीवर लावावा. फोटो स्वच्छ ठेवावा.

होणारा लाभ

सात धावत्या घोड्यांचा फोटो लावणे आर्थिक प्रगती आणि समृद्धी येते. याशिवाय सकारात्मक उर्जा, व्यापार किंवा करियरमध्ये गती येते. एवढेच नव्हे घरात धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते.

या गोष्टी ठेवा लक्षात

फोटो व्यवस्थितीत लावा आणि नियमित त्याची स्वच्छता करावी. तुटलेला किंवा काच फुटलेला फोटो अजिबात लावू नये.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Evil Eye Bracelet Designs: फॅशन आणि प्रोटेक्शनचे परफेक्ट मिश्रण!

New Year 2025 : जीवन बदलण्यासाठी नवीन वर्षात करा 'हे' ८ संकल्प!