- Home
- lifestyle
- 7 Protein Rich Foods For Weight Loss : वजन घटवायचंय?, या ७ प्रोटीनयुक्त पदार्थांनी करा सुरुवात
7 Protein Rich Foods For Weight Loss : वजन घटवायचंय?, या ७ प्रोटीनयुक्त पदार्थांनी करा सुरुवात
7 Protein Rich Foods For Weight Loss :वजन कमी करताना योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, पोट भरलेले राहते आणि स्नायूंची झपाट्याने झीज होण्यापासून बचाव होतो.

प्रोटीनयुक्त पदार्थ
वजन कमी करण्यासाठी मदत करणारे ७ प्रोटीनयुक्त पदार्थ.
बदाम
बदामामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्व ई, मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात. पाच बदामांमध्ये दीड ग्रॅम प्रथिने असतात.
सोयाबीन
१०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅम प्रथिने असतात. तसेच कॅल्शियम देखील असल्याने ते खाणे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
शेंगदाणे
१०० ग्रॅम शेंगदाण्यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे ते देखील आहारात समाविष्ट करावे.
अंडी
एका अंड्यामध्ये सहा ग्रॅम प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम देखील असते.
भोपळ्याच्या बिया
१०० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये १९ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे प्रथिनांची कमतरता असलेल्यांनी भोपळ्याच्या बिया देखील आहारात समाविष्ट कराव्यात.
दही
१०० ग्रॅम दह्यामध्ये ११ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे दही देखील आहारात समाविष्ट करावे.
ओट्स
१०० ग्रॅम ओट्समध्ये २६ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे प्रथिनांची कमतरता असलेल्यांसाठी ओट्स हा एक उत्तम आहार आहे.

