MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Less Oily Puris : पुऱ्या खूप तेलकट होतात? या ७ सोप्या टिप्स वापरून बनवा कुरकुरीत पुऱ्या

Less Oily Puris : पुऱ्या खूप तेलकट होतात? या ७ सोप्या टिप्स वापरून बनवा कुरकुरीत पुऱ्या

गरमागरम आणि टम्म फुगलेली पुरी सगळ्यांनाच आवडते. पण अनेकदा पुऱ्या खूप तेल पितात आणि जड होतात. पीठ घट्ट मळणे, त्यात थोडा रवा मिसळणे आणि तेलाचे तापमान योग्य ठेवणे, यांसारख्या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही पुऱ्या तेलकट होण्यापासून वाचवू शकता.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 26 2026, 04:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
कमी तेलात तळा पुऱ्या
Image Credit : Gemini ai

कमी तेलात तळा पुऱ्या

सणवार असो किंवा घरी पाहुणे आले की, आपल्याकडे आवर्जून पुऱ्या बनवल्या जातात. छोले किंवा बटाट्याच्या भाजीसोबत कुरकुरीत पुरी खायला खूप छान लागते. पण पुऱ्या खूप तेलकट होतात म्हणून अनेक जण त्या खाणे टाळतात. तेलकट पुऱ्या दिसायलाही चांगल्या वाटत नाहीत आणि खाल्ल्यावर जडपणा येतो. पुऱ्यांनी जास्त तेल पिऊ नये यासाठी स्वयंपाकघरातील काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच कामी येतील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
वाचा टिप्स
Image Credit : AI Gemini Generated

वाचा टिप्स

पीठ नेहमी घट्ट मळा

पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ घट्ट मळणे गरजेचे आहे. पोळीच्या पिठासारखे पुरीचे पीठ मऊ नसावे. पीठ मळताना पाण्याचा वापर कमी करा आणि ते घट्ट व एकजीव मळले जाईल याची काळजी घ्या.

पिठात रवा किंवा बेसन मिसळा

पीठ मळताना त्यात थोडा रवा किंवा बेसन घाला. काही जण यात थोडा मैदाही घालतात. एक कप गव्हाच्या पिठासाठी साधारण २ चमचे रवा किंवा बेसन वापरा. यामुळे पुऱ्या जास्त तेल पीत नाहीत आणि छान कुरकुरीत होतात.

कोरडे पीठ लावू नका

पुऱ्या लाटताना त्यांना कोरडे पीठ लावू नका. हे पीठ गरम तेलात जळते, त्यामुळे तेल खराब होते आणि पुऱ्या जास्त तेल पितात. त्याऐवजी, लाटण्यापूर्वी पिठाच्या गोळ्याला थोडे तेल किंवा तूप लावा.

Related Articles

Related image1
Kitchen Gardening: जागेचं टेन्शन विसरा, बाल्कनीतल्या कुंडीतच अशी वाढवा कारल्याची वेल
Related image2
Cooking Oil : शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या काय आहे सायन्स
34
हे देखील लक्षात ठेवा
Image Credit : Getty

हे देखील लक्षात ठेवा

शिळे पीठ वापरू नका

पुऱ्या बनवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेले जुने पीठ वापरू नका. शिळ्या पिठाच्या पुऱ्या जास्त तेल पितात आणि नीट फुगतही नाहीत. चांगल्या पुऱ्यांसाठी नेहमी ताजे पीठ मळून घ्या.

तेलाचे तापमान योग्य ठेवा

तेल योग्य तापमानावर गरम असणे खूप महत्त्वाचे आहे. तेल खूप जास्त गरम असेल तर पुऱ्या लगेच करपतात. आणि जर तेल पुरेसे गरम नसेल, तर त्या जास्त तेल पितात. तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करा आणि पुऱ्या मध्यम-मोठ्या आचेवर तळा.

पुरी सतत पलटी करू नका

गरम तेलात पुरी सोडल्यावर ती फुगण्यासाठी झाऱ्याने हलके दाबा. एका बाजूने चांगली तळली गेल्यावरच ती पलटी करा. पुरी सतत उलट-पालट केल्यास ती जास्त तेल पिऊ शकते.

44
टिश्यू पेपर महत्वाचा
Image Credit : stockphoto

टिश्यू पेपर महत्वाचा

टिश्यू पेपरचा वापर करा

पुऱ्या तळून झाल्यावर त्या टिश्यू पेपरवर किंवा किचन टॉवेलवर काढा. यामुळे पुऱ्यांमधील जास्तीचे तेल शोषले जाते आणि त्या तेलकट लागत नाहीत.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही कमी तेलात मस्त फुगलेल्या आणि कुरकुरीत पुऱ्या बनवू शकता. पुढच्या वेळी घरी पुऱ्या बनवताना या ट्रिक्स नक्की वापरून पाहा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Sunflower Seeds : रोज सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो माहितीये का?
Recommended image2
गळ्यात नेकलेस नसतानाही साडीवर उठून दिसतील हे फुल नेक ब्लाऊज डिझाईन्स
Recommended image3
Rice Cooking Methods : कुकरचा भात की पातेल्यातला? आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?
Recommended image4
Ajwain Vs Saunf : जेवणानंतर ओव्याचं पाणी प्यावं की बडीशेपचं?
Recommended image5
Empty Stomach Foods : सकाळी रिकाम्या पोटी काय खावं आणि काय टाळावं?
Related Stories
Recommended image1
Kitchen Gardening: जागेचं टेन्शन विसरा, बाल्कनीतल्या कुंडीतच अशी वाढवा कारल्याची वेल
Recommended image2
Cooking Oil : शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या काय आहे सायन्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved