MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Cancer Causing Household Items : रोजच्या वापरातील या 6 वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

Cancer Causing Household Items : रोजच्या वापरातील या 6 वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

कॅन्सरच्या वाढत्या केसेस सध्या खूप चिंतेचा विषय बनल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सर काही एका रात्रीत होत नाही. आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टीही याला कारणीभूत ठरू शकतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 05 2026, 10:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
रोजच्या वापरातील या ६ वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका
Image Credit : stockphoto

रोजच्या वापरातील या ६ वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

कॅन्सरच्या वाढत्या केसेस सध्या खूप चिंतेचा विषय बनल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सर काही एका रात्रीत होत नाही. घातक रसायनांचा सतत संपर्क, चुकीचा आहार आणि जीवनशैली, हार्मोन्समधील बदल, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि उपचारांना होणारा उशीर यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. फक्त खाण्यापिण्याच्या सवयीच नाही, तर आपण घरात रोज वापरत असलेल्या काही वस्तूंमुळेही कॅन्सर होऊ शकतो. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, ते आपण जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
प्लास्टिकच्या डब्यांचा रंग उडालाय किंवा वास येतोय? लगेच फेकून द्या
Image Credit : Getty

प्लास्टिकच्या डब्यांचा रंग उडालाय किंवा वास येतोय? लगेच फेकून द्या

आपण घरात अन्न साठवण्यासाठी प्रामुख्याने प्लास्टिकचे डबे वापरतो. पण यात गरम अन्न ठेवल्यास किंवा मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. जुने झालेले किंवा मायक्रोवेव्हसाठी योग्य नसलेले डबे गरम केल्यावर त्यातून BPA सारखी रसायने आणि मायक्रोप्लास्टिकचे कण अन्नात मिसळतात. ही रसायने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात आणि पेशींचे मोठे नुकसान करतात.

Related Articles

Related image1
Kadai Vs Pressure Cooker : चव आणि आरोग्यासाठी कोणतं भांडं बेस्ट?
37
कोटिंग खराब झालेले नॉन-स्टिक पॅन वापरणे टाळा
Image Credit : Getty

कोटिंग खराब झालेले नॉन-स्टिक पॅन वापरणे टाळा

आजकाल बहुतांश घरांमध्ये डोसा किंवा चपाती बनवण्यासाठी नॉन-स्टिक पॅनचा सर्रास वापर होतो. हे पॅन वापरायला सोपे असले तरी, ते जास्त गरम करणे किंवा कोटिंग खराब झाल्यावरही वापरणे धोक्याचे असते. जास्त तापमानावर हे पॅन गरम केल्यास त्यातून आरोग्याला घातक असणारे कण बाहेर पडतात. त्यामुळे पॅनचे कोटिंग खराब झाल्यावर लगेच नवीन पॅन खरेदी करा.

47
हॉटेलमध्ये अन्न पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर होतो
Image Credit : Getty

हॉटेलमध्ये अन्न पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर होतो

हॉटेलमध्ये अन्न पॅक करण्यासाठी अनेकदा ॲल्युमिनियम फॉइल वापरतात. कधीतरी याचा वापर करणे ठीक आहे, पण आंबट पदार्थ सतत ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवल्यास अन्नात ॲल्युमिनियमचे अंश मिसळण्याची शक्यता असते. ॲल्युमिनियम फॉइलमुळे थेट कॅन्सर होतो असे सिद्ध झालेले नसले तरी, त्याचा अतिवापर टाळणेच योग्य आहे. याऐवजी तुम्ही स्टीलच्या डब्यांचा वापर करू शकता.

57
एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा
Image Credit : Getty

एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा

आपण अनेकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरतो. पण असे केल्याने तेलात अल्डिहाइड्स आणि ऑक्सिडाइज्ड फॅट्ससारखी घातक संयुगे तयार होतात. ही रसायने कालांतराने शरीरात सूज (inflammation) आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात. त्यामुळे एकदा वापरलेले तेल पुन्हा जेवणात वापरणे नक्की टाळा.

67
प्लास्टिकच्या बाटल्यांचा सतत वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक
Image Credit : stockPhoto

प्लास्टिकच्या बाटल्यांचा सतत वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक

प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात किंवा जास्त उष्णतेच्या ठिकाणी ठेवू नका. तसेच एकाच बाटलीचा सतत वापर करणेही टाळा. कधीतरी या बाटल्या वापरल्याने फारसा त्रास होत नाही, पण गरम झालेल्या किंवा जुन्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून सतत पाणी पिणे आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते.

77
काही मेकअप उत्पादनांमध्ये घातक रसायनांचा अंश असू शकतो
Image Credit : Getty

काही मेकअप उत्पादनांमध्ये घातक रसायनांचा अंश असू शकतो

आपण रोज वापरत असलेल्या मेकअप उत्पादनांमुळे थेट कॅन्सर होत नसला तरी, काही उत्पादनांमध्ये विशिष्ट रसायनांचे अत्यंत सूक्ष्म अंश असू शकतात. कंपन्या जेव्हा हे साहित्य बनवतात, तेव्हा पिगमेंट्स आणि पावडरमध्ये शिसे (Lead), आर्सेनिक आणि कॅडमियम यांसारखे घातक घटक नकळतपणे मिसळले जाण्याची शक्यता असते.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
1 Gram Gold Rings : 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाइन्स पाहाच
Recommended image2
Gold Nose Pin : रोजच्या वापरासाठी या नोज पिन्स आहेत एकदम बेस्ट
Recommended image3
Bone Health Foods : हाडं मजबूत करण्यासाठी आहारात घ्या हे 7 पदार्थ
Recommended image4
Jupiter Exalted in Cancer : नवरात्रीच्या सुरुवातीलाच गुरु उच्च राशीत; या 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस
Recommended image5
Healthy Paratha : पराठे बनवताना तूप, बटर की तेल... आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?
Related Stories
Recommended image1
Kadai Vs Pressure Cooker : चव आणि आरोग्यासाठी कोणतं भांडं बेस्ट?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved