रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरतात हे 5 संकेत

| Published : Jan 14 2025, 09:51 AM IST

get out of the relationship

सार

सध्याच्या घडीला नातेसंबंध जपणे फार अवघड झाले आहे. नात्यात एकटेपणा, अविश्वास अशा काही गोष्टी घडत असल्यास नाते मोडलेलेच बरे असे काहींना वाटते. जाणून घेऊया रिलेशिपमधून बाहेर पडण्यासाठी कोणते संकेत दिसतात.

5 Signs to breakup in relationship : नातेसंबंध जोडणे जेवढे सोपे असते तेवढेच टिकवून ठेवणे कठीण असते. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर मनात वेगवेगळ्या शंका सतत येत राहतात. पण याचा अर्थ असा होत नाही की, नाते मोडण्यासाठी कपलमध्ये वेळोवेळी भांडणे, वाद झालेच पाहिजेत. काही संकेतच्या माध्यमातूनही कळते की आता नाते मोडण्याची वेळ आलीये.

एकत्रित राहूनही एकटेपणा वाटणे

पार्टनरसोबत भावनिक नातेसंबंध असल्यासारखे वाटत नसल्यास तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहात हे समजून घ्या. एकत्रित राहूनही नात्यात एकटेपणा वाटणे आणि कोणत्याही प्रकारचा पाठिंबा न मिळणे हे नाते मोडण्यासाठीचे कारण ठरू शकते.

एकाच मुद्द्यावर टिकून राहणे

पार्टनरसोबत सातत्याने एकाच गोष्टीवरुन वाद होत असल्यास आणि त्यावर तोडगा निघत नसेल तर नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही.कोणत्याही नात्यामध्ये वाद होणे सामान्य बाब आहे. पण दीर्घकाळ एकाच मुद्द्यावरुन पार्टरनसोबत वाद घातल्याने नाते मोडले जाऊ शकते. अशातच अशा नात्यामधून बाहेर पडणे महत्वाचे आहे.

अविश्वास आणि आदर न करणे

आजकाल कपल्समध्ये अविश्वास आणि एकमेकांना आदर न देण्याची समस्या उद्भवली जात असल्याचे दिसून येते. पार्टनरची चारचौघांत मस्करी करणे, सर्वांसमोर पार्टनरला वाट्टेल तसे बोलणे अशा काही गोष्टींमुळे नात्यामध्ये प्रेम उरत नाही. अशा नात्यामधून बाहेर पडण्याचा विचार करावा.

नात्यासाठी आनंद गमावून बसणे

हेल्दी रिलेशनशिपसाठी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे महत्वाचे असते. नाते टिकवण्यासाठी स्वत: चा आनंद गमावून बसणे फार चुकीचे आहे. यामुळे नात्यात प्रेम, विश्वास कायम टिकून राहण्यासाठी दोन्ही पार्टनरने एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते. पण असे होत नसल्यास नात्यामधून बाहेर पडणे उत्तम पर्याय आहे.

आणखी वाचा : 

पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी पतीने करून पाहाव्यात अशा गोष्टी, नक्की करून पहा

Chanakya Niti : या तीन गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नका, प्रगती कराल