सार
प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीपासून महाकुंभाची सुरुवात होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची, साधूंची गर्दी होते. यंदाच्या महाकुंभात स्नानासाठी जाणार असल्यास त्याच्या बाजूला असणाऱ्या काही ऐतिसाहिक ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
5 places to visit near Maha Kumbh Mela 2025 : यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक 12 वर्षांमध्ये आयोजित केला जाणारा हा मेळा अत्यंत खास असण्यासह त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. या कुंभ मेळ्यात देश-विदेशातून भाविक येतात. यंदाच्या महाकुंभ मेळ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून होणार असून 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. कुंभ मेळा विशेष रुपात त्रिवेशी संगममध्ये (गंगा, यमुना आणि सरस्वती) स्नान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये स्नान केल्याने अश्वमेघ यज्ञासमान पुण्य मिळते असे मानले जाते. अशातच यंदा कुंभामध्ये स्नान करण्यास जाणार असल्यास त्याच्या बाजूला असणाऱ्या पुढील काही ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
इलाहाबाद किल्ला
वर्ष 1583 मध्ये मुघल बादशाह अकबर यांनी इलाहाबाद किल्ला बांधला होता. या किल्ल्याला भेट देऊ शकता. येथे अक्षयवट झाड, अशोक स्तंभ, भूमिगत मंदिर पहायला मिळेल.
आनंद भवन
आनंद भवन येथे नेहरू परिवाराचे निवासस्थान होते. याचे बांधकाम वर्ष 1930 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी केले होते. यानंतर निवासस्थानाला संग्रहालयाचे रुप देण्यात आले होते. येथे नेहरू परिवार आणि स्वातंत्र्यासंबंधित माहिती जाणून घेता येईल.
खुसरो बाग
मुघल शासनस काळातील खुसरो बाग प्रयागराजमधील सर्वाधिक मोठे आकर्षण केंद्र आहे. असे सांगितले जाते की, येथे राजकुमार खुसरोचा आरामगाह होता. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात पडाल आणि मन शांतही होईल.
भारद्वाज आश्रम
भारद्वाज आश्रमाबद्दल असे सांगितले जाते की, मर्यादा पुरषोत्तम राम, देवी सीता आणि भाऊ लक्ष्म येथे एकत्रित येऊन थांबले होते. येथे भरत आणि सीता कुंडही पहायला मिळेल. अशी मान्यता आहे की, त्रेतायुगात भगवान रामाने भरतकुंडजवळ यज्ञ केले होते. या आश्रमात शिवालयही पहायला मिळेल, जे भारद्वाज ऋषींच्या काळात उभारण्यात आले होते. भारतीय संस्कृती, पौराणिक कथा आवडत असल्यास भारद्वाज आश्रमाला नक्की भेट देऊ शकता.
त्रिवेणी संगम
महाकुंभावेळी त्रिवेणी संगमला नक्की भेट द्या. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम होतो. येथेच कुंभाचे स्नान होते. यामुळे त्रिवेणी संगमला धार्मिक रुपात फार महत्व आहे.
व्हिटोरिया ममोरियल
इटलीमधील संगमरवरच्या दगडांनी तयार करण्यात आलेल्या व्हिटोरिया ममोरियलला भेट देऊ शकता. येथे आधी राणी व्हिक्टोरियाचा पुतळा होता. पण नंतर पुतळा हटवण्यात आला.
आणखी वाचा :
Prayagraj Maha Kumbh 2025: नागा साधू कपडे का घालत नाहीत?
कुंभमेळ्याला प्रयागराजला जायचंय? भारत गौरव विशेष ट्रेनने असा करा आरामदायक प्रवास