सार

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितींमध्ये व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगतिले आहे ज्याचे पालन घरातील थोरल्या व्यक्तीने केले पाहिजे. अन्यथा घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

Chanakya Niti : दैनंदिन आयुष्यात आपण ज्या गोष्टी करतो त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर होतो. काही गोष्टींचा त्याग करणे किंवा आत्मसात केल्याने आयुष्य एकतर सुधारते अथवा बिघडले जाते. आचार्च चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे ज्या महिला आणि पुरुषांनी आत्मसात करणे नुकसानदायक ठरू शकते. एवढेच नव्हे या सवयी घर देखील उद्ध्वस्त करू शकते.

नियमांचे स्वत: पालन न करणे

घरातील प्रमुख व्यक्तीने आपण थोरले असल्याच्या नात्याने परिवारासाठी नियम तयार केले आहेत ते स्वत: देखील पाळावेत. बहुतांशवेळा असे होते की, घरातील सर्वांसाठी जे कायदे -नियम तयार केले जातात ते घरातील प्रमुख व्यक्ती पाळत नाही. नियम केवळ घरातील सर्व लहानांनाच लागू होतात. चाणाक्य नितीमध्ये म्हटले आहे की, जे नियम दुसऱ्यांसाठी बनवले आहेत त्याचे स्वत: देखील पालन करावे.

अन्नाचा नाश करणे

चाणाक्य नितीमध्ये अन्नाचा नाश करण्याची सवय अत्यंत वाईट मानली आहे. बहुतांश घरांमधील थोरली मंडळी अन्नाचा अपमान किंवा नाश करू नये असे सांगतात. पण थोरल्या व्यक्तीने असे केल्याने घराची भरभराट होणे थांबते. ही गोष्ट देखील घर उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरू शकते. आर्थिक समस्येसह वाद, भांडणे देखील घरात होऊ शकतात.

विनाकारण खर्च करणे

चाणक्य नितीनुसार, पैशांचा अपव्यय करण्याची सवय योग्य नाही. खासकरुन अशा व्यक्तीने जो घराचा प्रमुख आहे. घरातील प्रमुखाने मर्यादित आणि विचार करुन पैसे खर्च करावेत. विनाकारण खर्च करू नये. यामुळे घरात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Chanakya Niti: मैत्री करताना सावधान! नाहीतर आयुष्य होईल उद्ध्वस्त

Chanakya Niti: मुलांवर लहानपणी कसे संस्कार करावेत, चाणक्य सांगतात