Winter session : चित्रपटसृष्टीतून संसदेत पाऊल ठेवलेल्या कंगना रणौतने, आपल्या राजकीय कारकिर्दीतही फॅशनप्रेमींना आश्चर्यचकित केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कंगनाने सादर केलेली ड्रेसिंग स्टाईल चर्चेचा विषय ठरली आहे.
Winter session : भारतीय संसदेने लोकसभा तसेच राज्यसभा सदस्यांचा परखडपणा, बुद्धीवादी मतप्रदर्शन, वाक्-चातुर्य असे विविध गुण पाहिले. त्याचबरोबर सिनेसृष्टी तसेच अन्य कला-क्रीडा क्षेत्रांतील वलय असलेले सदस्यही पाहिले. अभिनेत्री रेखा, जयाप्रदा, जया भादुरी, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, सनी देओल, गोविंदा या फिल्मी तारे-तारकांचा समावेश होता. यात सौंदर्यावती रेखा आणि हेमा मालिनी यांची जास्त चर्चा झाली. आता चर्चा सुरू आहे ती, अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांची.
फॅशनच्या बाबतीत स्वतःची एक खास स्टाइल जपणाऱ्या व्यक्तींमध्ये कंगना रणौत यांचे नाव आघाडीवर आहे. चित्रपटात असो किंवा राजकारणात, कंगना यांची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते. भाजप खासदार कंगना रणौत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत सुंदर अंदाजात पोहोचील्या. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या हातमागाच्या साड्या आणि क्लासिक लूक ट्राय करून कंगना यांनी भारतीय पेहरावाचा दिमाख दाखवून दिला.
1. हातमागाच्या साड्यांमधील राजेशाही थाट

संसदेच्या अधिवेशनाच्या बहुतेक दिवसांमध्ये कंगना यांनी रॉयल लूक देणाऱ्या हातमागाच्या साड्यांची निवड केली. गडद रंगांपेक्षा तिने पेस्टल शेड्स आणि हलक्या रंगांना प्राधान्य दिले. कॉटन आणि सिल्क मटेरियलमधील साड्यांनी कंगना यांच्या लूकला एक वेगळी ओळख दिली.
2. विंटर कोट्स आणि ब्लेझर्स

थंडीचे दिवस असल्याने साडीसोबत मॅच होणारे लाँग कोट्स आणि ब्लेझर्स कंगना यांनी ट्राय केले. साडीच्या रंगाशी जुळणारे वुलन कोट्स स्टाईलसोबतच आरामदायी देखील होते. मॉडर्न आणि पारंपरिक लूक कसा एकत्र साधावा, याचे हे उत्तम उदाहरण होते.
3. ॲक्सेसरीजमध्ये साधेपणा

मिनिमल ज्वेलरी हे यावर कंगनाचा भर होता. गळ्यात साधा मोत्याचा हार आणि कानात छोटे स्टड्स घालून त्यांनी खासदारकीला साजेसा डीसेंट लूक कायम ठेवला. मोठ्या ब्रँडेड हँडबॅग्ज आणि कूलिंग ग्लासेसमुळे त्यांच्या लूकला एक लक्झरी टच मिळाला.
4. हेअर स्टाईल आणि मेकअप

आपले नैसर्गिक कुरळे केस सुंदरपणे बांधून, तर कधी मोकळे सोडून कंगना अधिवेशनात दिसल्या. मेकअपच्या बाबतीतही त्यांनी अतिशय साधी शैली वापरली. न्यूड शेड लिपस्टिक आणि हलक्या आयलायनरने त्यांच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक दिली.
कंगना यांची स्टाईल का लक्ष वेधून घेते?

केवळ एक चित्रपट अभिनेत्री म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कंगना यांनी आपल्या पेहरावात केलेले बदल फॅशन तज्ज्ञांकडून मोठी प्रशंसा मिळवत आहेत. भारतीय वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देणारी त्यांची निवड 'व्होकल फॉर लोकल' हा संदेशही देते.
कंगना रणौत यांच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील वॉर्डरोब पाहिल्यावर, पारंपरिक भारतीय पोशाख किती प्रभावीपणे आणि स्टायलिशपणे परिधान करता येतो, याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते.आगामी काळात साडीप्रेमींना फॉलो करण्यासाठी अनेक फॅशन टिप्स कंगना यांच्या या लूकमध्ये आहेत.


