Lok Sabha Election 2024: राहुल गांधींची संपत्ती किती? कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे तर, स्टॉक मार्केटची गुंतवणूक किती जाणून घ्या...

| Published : Apr 04 2024, 01:52 PM IST / Updated: Apr 04 2024, 01:54 PM IST

Rahul Gandhi Dance
Lok Sabha Election 2024: राहुल गांधींची संपत्ती किती? कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे तर, स्टॉक मार्केटची गुंतवणूक किती जाणून घ्या...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली.

 

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून त्यांनी 2019 साली विजय मिळविला होता. यावेळी उमेदवारी अर्जसह दाखल केलेल्या शपथपत्रात राहुल गांधी यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 4.3 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. तर म्युच्युअल फंडात 3.81 कोटींची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यात 26.25 लाख रुपये असलयाचे त्यांनी शपथपत्रात म्हंटले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे 55 हजारांची रोकड आणि 2022-23 या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 1.02 कोटी असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे 15.2 लाखांचे गोल्ड बॉण्ड आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेविंग्ज स्किम), पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून 61.52 लाख रुपये गुंतविले असलयाचे सांगितले आहे. केरळमधील लोकसभेच्या 20 जागांसाठी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

शेअरमधील गुंतवणूक:

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड - 42.27 लाख रुपयांचे 1474 शेअर्स

बजाज फायनान्स लिमिटेड - 35.89 लाख किंमतीचे 551 शेअर्स

नेस्ले इंडिया लिमिटेड - 35.67 लाख किंमतीचे 1370 शेअर्स

एशियन पेंट्स लिमिटेड - 35.29 लाख किंमतीचे 1231 शेअर्स

टायटन कंपनी लिमिटेड - 32.59 लाखांचे 897 शेअर्स

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड - 27.02 लाख किमतीचे 1161 शेअर्स

आयसीआयसीआय बँक - 24.83 लाख किमतीचे 2299 शेअर्स

डिव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेड - 19.7 लाख रुपये किमतीचे 567 शेअर्स

सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड - 16.65 लाख किमतीचे 4067 शेअर्स

गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड - 16.43 लाख किमतीचे 508 शेअर्स

म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक:

एचडीएफसी स्मॉल कॅप रेग-जी - 1.23 कोटी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग सेव्हिंग्ज-जी - 1.02 कोटी

पीपीएफएएस एफसीएफ डी ग्रोथ - 19.76 लाख

एचडीएफसी एमसीओपी डीपी जीआर - 19.58 लाख

आयसीआयसीआय ईक्यू अँड डीएफएफ - 19.03 लाख

आणखी वाचा:

रणदीप सुरजेवाला यांचे हेमा मालिनींबद्दल वादग्रस्त विधान, भाजपसह कंगना राणौतने केला काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल

Gold Prize : गुढी पाडव्याआधीच सोने जाणार ७२ हजारांवर !

प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपमध्ये केला प्रवेश, विनोद तावडेंनी परत दाखवली कमाल