Voter Education : आदर्श आचार संहिता म्हणजे काय? जाणून घ्या कोण लागू करतात आणि नियमांबद्दल सविस्तर

| Published : Mar 15 2024, 01:18 PM IST / Updated: Mar 21 2024, 04:49 PM IST

voting

सार

आगामी लोकसभेच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. अशातच राजकीय पक्षांसाठी निवडणूकीआधी आदर्श आचार संहिता लागू केली जाते. पण आदर्श आचार संहिता म्हणजे काय? यासंबंधित नियम आणि कोण लागू करू शकतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. यानंतर संपूर्ण देशात आदर्श आचार संहिता लागू केली जाते. पण आदर्श आचार संहिता कोण लागू करतात आणि याचे नियम काय आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

आदर्श आचार संहिता म्हणजे काय?
आदर्श आचार संहिता निवडणुकीच्या तारखा जारी केल्यानंतर लागू केली जाते. यावेळी काही गाइडलाइन्स आणि नियमांचे पालन राजकीय पक्षांसह त्यांच्या नेत्यांना करावे लागते. खरंतर, आदर्श आचार संहिता निवडणूक आयोगाकडून लागू केली जाते. याचा उद्देश असा आहे की, देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक होणे.

प्रत्येक लोकसभा निवडणुकीआधी आदर्श आचार संहिता लागू केली जाते. याशिवाय विधानसभा निवडणुकीवेळी ज्या राज्यात निवडणूक होणार आहे तेथेच आदर्श आचार संहिता लावली जाते.

आदर्श आचार संहितेच्या मार्गदर्शक सुचना आणि नियम

  • राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आदर्श आचार संहिता लागू केल्यानंतर अशी कामे करू शकत नाही ज्यामुळे वेगवेगळ्या समुदायातील अथवा धार्मिक समूहांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होईल.
  • राजकीय पक्षांची टीका ही धोरणे आणि कार्यक्रमांवर आधारित असावी. कोणात्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करू नये.
  • सार्वजनिक सभा, रॅली आणि मिरवणुका आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडून आधीच परवानगी घ्यावी.
  • लाउड स्पीकरचा वापर नियंत्रित केला जातो. याचा वापर स्थानिक अधिकाऱ्यांद्वारे लावण्यात आलेल्या नियमांनुसार करावा.
  • सायलेन्स झोन घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मिरवणूक काढू शकत नाही.
  • मतदानाच्या दिवशी निवडणुकीसंदर्भात प्रचार करू शकत नाही. या दिवशी सर्व राजकीय जाहिरातबाजी आणि अभियान करण्यासही बंदी आहे.
  • मतदान केंद्रामध्ये केवळ मतदार, निवडणूक अधिकारी आणि मतदान कर्मचाऱ्यांना जाण्याची परवानगी असते.
  • मतदान केंद्राजवळ फिरणे आणि प्रचार करण्यास परवानगी नाही.
  • मतदान केंद्रामध्ये कशाप्रकारे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी राजकीय पक्ष आपल्या एजेंटची नियुक्ती करू शकतात. पण त्यांनी निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्सचे पालन करणे बंधनकारक असते.
  • ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांनी निवडणूक प्रचाराच्या अभियानासाठी शासकीय संसाधनांचा वापर करू नये.
  • एखादा नेता आणि राजकीय पक्षाने आचार संहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाद्वारे कार्यवाही केली जाते.

आदर्श आचार संहिता लागू केल्यानंतर सरकार काय करू शकत नाही?

  • आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर मतदारांसाठी नव्या योजना, प्रकल्पांची घोषणा केली जाऊ शकत नाही.
  • ज्या योजना आणि प्रकल्प सुरू आहेत त्याचा वापर राजकीय लाभ मिळवण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
  • कोणताही उमेदवार निवडणुकीच्या प्रचारासाठी किती गाड्यांचा वापर करतो यावर मर्यादा नाही. पण या सर्वाची माहिती डीईओ यांना द्यावी लागते, ज्यामुळे यासंदर्भातील खर्चाची तपासणी केली जाऊ शकते.
  • आचार संहिता लागू केल्यानंतर सरकारने मोठ्या अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे निर्णय घेऊ नये. यासाठी अत्यंत गरजेचे आहे की, सरकारने निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • निवडणूक प्रचारासाठी शासकीय परिसर, गाड्या आणि उपकरणांचा वापर करू नये.

आणखी वाचा : 

Election Commissioner : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहात? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

देशभरात CAA लागू, लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय