सार
Viral Video : परीक्षेचे टेंन्शन सर्वांनाच येते. पण अभ्यासच केला नसेल तर परीक्षेत काय पास होणार? अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत पैसे ठेवण्यासह एक खास मेसेजही लिहिलाय.
Viral Video : परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करावाच लागतो. अन्यथा परीक्षेत नापास झाल्याने वर्ष फुकट जाते. बहुतांश विद्यार्थी मेहनतीने परीक्षेचा अभ्यास करतात आणि त्याची योग्य उत्तरे उत्तरपत्रिकेत आत्मविश्वासाने लिहितात. पण सोशल मीडियावर अनेकवेळा विद्यार्थ्यांनी शायरी, कविता किंवा भन्नाट मेसेज, उत्तरे लिहिल्याचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच आताही एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नक्की काय आहे व्हिडीओत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत 200 रुपयांची नोट ठेवली आहे. याशिवाय असेही लिहिलेय की, “चल उत्तरपत्रिका गुरूकडे जाऊया....इच्छा असल्यास ते पास करतील”. खरंतर, विद्यार्थ्याला शिक्षकाने परीक्षेत पास करावे म्हणून उत्तरपत्रिकेत 200 रुपयांची नोट ठेवण्यासह एक खास मेसेजही लिहिला आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ @quicshorts ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला लाखोच्या संख्येने पाहिले असून त्याखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.
आणखी वाचा :
त्रिचूर ब्रदर्स यांचे 'मेरा राम मेरा प्राण' संगीताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक (Watch Video)
Viral Video : दुकानदारासमोरच तरूणीचा अश्लील प्रकार, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त