UP Hit and Run CCTV video : उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात शनिवारी बैतालपूर मुख्य महामार्गावर एका वेगवान कारने बाईकला धडक दिल्याने एक व्यक्ती आणि एक लहान मुल जखमी झाले.
UP Hit and Run CCTV video : हिच आणि रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ पुण्यामुंबईतच नाही तर इतर शहरांमध्येही या घटना वाढल्या आहेत. अपघात झाल्यावर मोठ्या वाहनाचा चालक तेथून पळ काढताना दिसून येतो. कायदेशीर कचाट्यात अडकलो तर आपल्याला शिक्षा होईल तसेच घटनास्थळी थांबलो तर लोक आपल्याला मारहाण करतील अशी लोकांना भीती असते. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात शनिवारी बैतालपूर मुख्य महामार्गावर एका वेगवान कारने बाईकला धडक दिल्याने एक व्यक्ती आणि एक लहान मुल जखमी झाले. ही धक्कादायक हिट-अँड-रनची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आता व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, एक बाईकस्वार एका मुलासोबत प्रवास करत असताना एका वेगवान कारने मागून त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली, ज्यामुळे ते दोघेही रस्त्यावर फेकले गेले. धक्कादायक म्हणजे, त्याच दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारने खाली पडलेल्या जखमींवरून गाडी चालवली. मदत करण्याऐवजी दोन्ही गाड्यांचे चालक घटनास्थळावरून पळून गेले आणि जखमी व्यक्ती व मुलाला रस्त्यावरच सोडून दिले.
(व्हिडिओमध्ये विचलित करणारी दृश्ये आहेत. दर्शकांनी आपल्या जबाबदारीवर पाहावा.)
या गोंधळात, उपस्थित लोकांनी पीडितांना मदत केली. त्यांनी वेगाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की, पीडितांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये ही भयावह घटना कैद झाली आहे आणि आता हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पोलीस याचा वापर आरोपी वाहनांना ओळखण्यासाठी करत आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे आणि हिट-अँड-रन चालकांचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


