सार
20 मार्च आणि 23 सप्टेंबर, या दिवशी दिवस व रात्र समान असतात. या तारखांना खगोलशास्त्रात 'विषुव दिवस' असे म्हणतात.खगोलीय कारण? जाणून घ्या
मुंबई : आजच्या दिवसाचा महत्व म्हणजे आज आज 12 तासांची रात्र अन् 12 तासांचा दिवस, वर्षांतून 2 वेळा येतो असा योग, काय आहे खगोलीय कारण? हे अनेकांना माहित नाही. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा २० मार्च दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे.
या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
या दिवशी आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आकाशात आहे. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो. त्याला शरद संपात बिंदू असे म्हणतात.
विषुव दिन म्हणजे काय ?
सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते.
आणखी वाचा :
Nowruz 2024 :आज संपूर्ण भारतात साजरा केला जाणार नवरोज सण
भारतातील या प्रांतात कशी साजरी करतात होळी? त्यामागील कथा काय सांगतात जाणून घ्या