सार

T20 World Cup 2024 : अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 सामन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना झाला. भारताने आपला दुसरा सुपर-8 सामना पुन्हा जिंकला आहे. भारताने बांग्लादेश संघाचा 50 धावांनी पराभव केला आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अर्धशतक झळकावण्यासोबतच पांड्याने एक विकेटही घेतली.

अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांना भरपूर मात दिली. भारताने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 196 धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावा करत तर विराट कोहलीने 28 चेंडूत 37 धावा करत चांगली सुरुवात केली. चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर खेळायला आलेल्या ऋषभ पंतने 36 धावा केल्या. सूर्य कुमार यादवला केवळ 6 धावा करता आल्या. शिवम दुबेने 34 धावा केल्या. हार्दिक पांड्याने नाबाद 50 धावा केल्या. पांड्याने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अक्षर पटेलने ३२ धावा केल्या. तनझिम हसन, शाकिब आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 2 तर शकिब अल हसनने एक विकेट घेतली.

बांग्लादेशचा 50 धावांनी झाला पराभव

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली मात्र नंतरचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. सलामीवीर लिटन दासने 13 आणि तनजीद हसनने 29 धावा केल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 40 धावांची खेळी केली. तौहीद हृदयने 4 आणि शाकिब अल हसनने 11 धावा केल्या. महमुदुल्लाहने 13 आणि रिशाद हुसेनने 24 धावा केल्या. झाकीर अलीने 1 धाव, तनझिम हसन शाकिबने 1 धाव आणि महेदी हसनने 5 धावा केल्या. 20 षटके खेळल्यानंतर बांग्लादेशने 8 विकेट गमावून 146 धावा केल्या. कुलदीप यादवने 3 तर अर्शदीप सिंग-जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेतली. पांड्या सामनावीर ठरला.

आणखी वाचा :

T20 World Cup 2024 : सुपर 8 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय, सूर्य कुमार यादवचे शानदार अर्धशतक