India won T20 World Cup 2024: टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय

| Published : Jun 30 2024, 12:33 AM IST / Updated: Jun 30 2024, 12:35 AM IST

सार

India won T20 World Cup 2024: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं.

 

India won T20 World Cup 2024: टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होतं. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हन दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने 47 रन्स केल्या. शिवम दुबेने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्माने 9, रवींद्र जडेजाने 2 आणि हार्दिक पंड्याने 5 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

आणखी वाचा :

T20 Men's World Cup Prize money: विश्वचषक विजेत्यावरच नव्हे तर पराभूत संघावरही होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला मिळणार किती पैसे?

 

Read more Articles on