Smriti Irani Diet Plan : अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांनी कठोर शिस्त आणि योग्य आहाराच्या जोरावर तब्बल २७ किलो वजन कमी केले आहे. त्यांच्या या 'फॅट टू फिट' प्रवासात त्यांनी दिवसाची सुरुवात कशी केली.
Smriti Irani Diet Plan : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तुलसी विरानी या दमदार भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली स्मृती इराणी अभिनय, राजकारण आणि सोशल मीडियावर आजही तितकीच प्रभावी आहे. काळाच्या ओघात त्यांचे वजन वाढले, पण कठोर शिस्त आणि निश्चयाच्या जोरावर त्यांनी तब्बल 27 किलो वजन घटवत पुन्हा स्वतःला फिट केले आहे. ५० व्या वर्षीही त्यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी अनेकदा आपल्या ‘फॅट टू फिट’ प्रवासाविषयी उलगडत सांगितले आहे. चला जाणून घेऊयात. स्मृती इराणी नक्की कोणता आहार आणि व्यायाम पद्धती पाळतात?
दिवसाची सुरुवात : शरीर शुद्ध आणि ऊर्जा दुप्पट
स्मृती इराणी दिवसाची सुरुवात साध्या पण अतिशय परिणामकारक पद्धतीने करतात.
सर्वप्रथम कोमट पाण्याचे सेवन – पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील टॉक्सिन्स काढण्यासाठी
त्यानंतर ताजा सफरचंद किंवा गाजराचा ज्यूस – नैसर्गिक ऊर्जा मिळवण्यासाठी
नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थ, उकडलेली अंडी, पॉहे किंवा हलके पौष्टिक पर्याय
दुपारचे जेवण : कार्ब्सचे संतुलित व्यवस्थापन
भारतीय आहारात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, पण स्मृती इराणी त्यांचे प्रमाण नियंत्रीत ठेवतात.
त्यांच्या प्लेटमध्ये
भरपूर हिरव्या भाज्या
डाळ
चपाती किंवा ब्राऊन राईस/साधा भात
आणि नियमित एक वाटी दही – पचनासाठी उत्तम
स्नॅक्स : जंक फूडला कायमचा ‘नाही’
संध्याकाळच्या भुकेसाठी त्या निवडतात.
ताजी फळे
बदाम, अक्रोड
तसेच ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी – थकवा दूर करण्यासाठी
जंक फूडपासून दूर राहण्याच्या त्यांच्या सवयीनेच वजन कमी करण्यात मोठी मदत झाली.
रात्रीचे जेवण : हलके, साधे आणि हेल्दी
डिनर स्मृती इराणी नेहमी साधे ठेवतात.
हेल्दी सूप
स्टीम भाज्या
किंवा मासे आणि चपाती
झोपण्याआधी त्या एक वाटी फळे खातात, नैसर्गिक साखरेचा चांगला स्रोत.
नाईट रूटीन : टॉक्सिन्स आउट!
रात्री झोपण्यापूर्वी
कोमट पाणी
तसेच तुळशीची पाने चावून खाणे – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
यामुळे शरीर अधिक हलके, स्वच्छ आणि रिलॅक्स राहते.
व्यायाम : योग, पोहणे आणि मानसिक संतुलन
स्मृती इराणींचा फिटनेस रूटीन केवळ शारीरिक मेहनतीपुरता मर्यादित नाही.
त्यांचे मुख्य वर्कआउट
योग आणि ध्यान – तणाव कमी, मन स्थिर
पोहणे – शरीराला पूर्ण व्यायाम
कार्डिओ आणि जलद चालणे – हृदयाचे आरोग्य मजबूत
यामुळे त्यांचे वजन कमी झालेच, शिवाय त्या आतूनही फिट आणि एनर्जेटिक राहतात.
५० व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस!
वय, व्यस्त राजकीय जीवन, जबाबदाऱ्या यांच्यामध्येही स्मृती इराणींची सातत्यपूर्ण शिस्त, मेहनत आणि योग्य आहारामुळे त्यांचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास ‘आयकॉनिक’ बनला आहे.
टीप : वरील माहिती ही फक्त सर्वसाधारण माहितीसाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला, उपचार किंवा निदानाचा पर्याय नाही. कोणताही फिटनेस किंवा डाएट प्लॅन स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.


