RBI Repo Rate : कर्जदारांसाठी पुन्हा खुशखबर...! व्याजदर कमी होण्याची शक्यता
Good News : 2026 या नव्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घर आणि वाहन कर्जदारांचा मासिक हप्ता (EMI) कमी होण्याची शक्यता आहे.

व्याजदर कपात
बँक कर्जदारांना रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा आनंदाची बातमी देऊ शकते. 2026 मध्ये व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे अलीकडील अहवाल सांगतात. विशेषतः गृहकर्ज, वाहन कर्ज घेतलेल्यांचा EMI कमी होण्याची अपेक्षा आहे.
रिझर्व्ह बँक
मागील 2025 वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट चार वेळा कमी केला. त्यामुळे अनेक बँकांनी त्यांचे कर्जाचे व्याजदर कमी केले. परिणामी लोकांवरील EMI चा भार कमी झाला. पण व्याजदर कपात इथेच थांबणार नाही, 2026 मध्ये ती आणखी होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्याचे धोरण
IIFL Capital च्या अहवालानुसार, 2026 मध्ये व्याजदर एकूण 50 बेसिस पॉइंट्सने कमी होऊ शकतो. फेब्रुवारीच्या धोरण बैठकीत 25 पॉइंट्स आणि त्यानंतर आणखी 25 पॉइंट्सची कपात अपेक्षित आहे. यामुळे कर्जाचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो रेट
सध्या रेपो रेट आणि कोअर चलनवाढ दर (Core CPI) यातील फरक 2.8 टक्के आहे. गेल्या 7 वर्षांत हा फरक सरासरी 1.1 टक्के होता. त्यामुळे रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आर्थिक वाढ
UBI च्या ताज्या माहितीनुसार, फेब्रुवारी-एप्रिल 2026 च्या धोरण बैठकीत 25 बेसिस पॉइंट्सची कपात होऊ शकते. चलनवाढ, राष्ट्रीय सकल उत्पादन (GDP) यांसारखे घटक अनुकूल राहिल्यास, व्याजदर कपात सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जदारांसाठी 2026 हे वर्ष आशेचे आहे.

