इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S Somanath) यांनी बेंगळुरूमधील एशियानेट सुवर्णा न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात उपस्थित व्यक्तींशी विविध विषयांवर चर्चा केली.
हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना विधानासभेत बहुमत सिद्ध करता आले आहे. यामुळे झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचे सरकार स्थापन होणार आहे.
मापुसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, “अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे गोबी मंचुरियनवर (Gobi Manchurian) बंदी घालण्यात आली आहे."
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “काशी व मथुरा ही मंदिरे शांतपणे मुक्त झाल्यास आम्ही इतर मंदिरांबाबत आग्रह धरणार नाही.
मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांनी 31 जानेवारी (2024) रात्री गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याने त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अझहरी यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स यांच्याकडून नुकतीच एक यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये इज्राइल देशाने भारताबद्दल काय मत व्यक्त केलेय याबद्दल सांगण्यात आले आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवरील आणि सुंदर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आताही आनंद महिद्रांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये दोन चिमुकल्या मुली रिपोर्टिंग करताना दिसून येत आहेत.
मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे परंतु मी झुकणार नाही असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेल्या लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन तापले आहे.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) रविवार 4 फेब्रुवारी 2024 रोजी मेरठ येथून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या एजंटला अटक केली.