संदेशखळी प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवले जाणार आहे. त्याच्याविरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
‘भारत जोडो न्याय’ यात्रेदरम्यान मध्यप्रदेशातील शाजापुर येथे भाजप (BJP) कार्यक्रत्यांसह नेत्यांनी राहुल गांधींच्या हातात बटाटे दिले. याशिवाय जयश्रीराम आणि मोदींच्या नावे घोषणाही केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपच्या एका माजी नगरसेवकाने ठाणे-घोडबंदर मार्गावरील चेने गावात त्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश रोखणाऱ्या मिडीयनच्या बांधकामाचा निषेध नोंदवण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत गेले.
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते ए राजा आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा डीमकेच्या नेत्याने देश विरोधी विधाने दिल्याने खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी दक्षिणेतील राज्यांचा दौरा करत आहेत. मंगळवारी तेलंगणातील संगारेड्डी येथील जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.
राजस्थानमध्ये डॉक्टरांनी एक अजब शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये आईच्या पोटातच मुलगी गरोदर राहिली होती.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची ताकद जनता दल (युनाइटेड) आणि तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्याने कमी झाली आहे. अशातच जाणून घेऊया इंडिया आघाडीमध्ये कोणते पक्ष आहेत आणि वर्ष 2019 मधील निवडणुकीत किती जागा मिळाल्या होत्या याबद्दल सविस्तर.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे पूजा केली. त्यानंतर 6,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु करण्यात आले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बंगळुरूसह सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. त्यांनी सतरा ठिकाणी शोधमोहीम सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.