दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीच्या पथकाने अटक केले आहे. खरंतर, मद्य घोटाळ्यासंबंधित कारवाई करत ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतलेय.
भारतीय जनता पक्षाने याआधी दोन यादी जाहीर केल्या असून यातून काही प्रमाणात उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज भाजपाने तिसरी यादी जाहीर केली असून यात केवळ नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
आयपीएलच्या एक दिवस आधी चेन्नई संघाने मोठी घोषणा करत ऋतुराज गायकवाडला कर्णधार केले आहे. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात काँग्रेसची खदखद समोर आली आहे. अशातच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, कांग्रेसने भीतीपोटी भारतातील लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत.
केंद्र सरकारनं सोशल मीडियावरील कंटेटवर नजर ठेवण्यासाठी फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. पण आता सुप्रीम कोर्टानं त्यावर स्थगिती आणली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्हॉट्सअॅपवर विकासशील भारत मेसेज पाठवण्यासंदर्भात बंदी घातली आहे.
उद्या पासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार असून क्रिकेट प्रेमींशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर संघानी आता खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे.
भारतात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात 18 वर्षांवरील भारतातील नागरिकांना मतदान करण्याचा हक्क असतो. पण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर....
दिल्लीतील वेलकम परिसराती एक दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेच दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.