काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नुकत्याच एका जनसभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुरेतील खासदार हेमा मालिनी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता भाजपसह कंगना राणौतने रणदीप सुरजेवाला यांना चांगलेच सुनावले आहे.
सध्या सोन्याच्या दाराने मोठी उच्चांकी घेतली आहे. १० ग्रॅम सोने ७०,७०० रुपयांवर गेले आहे. त्यामुळं पाढव्याच्या मुहूर्तावर खरेदीदारांची मागणी पाहता सोने ७२ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथून प्रहार पक्षाकडून उमेदवाराने अर्ज भरला आहे. प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक झाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी भक्कम उभे असलेले त्यांचे कुटुंब हे नेमकी कोण आहे आणि काय करतात तसेच त्यांचे शिक्षण काय जाणून घ्या.
अक्षय पत्र फाउंडेशन भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न पुरवते. या फाउंडेशनद्वारे आतापर्यंत 4 अब्जाहून अधिक लोकांना जेवण देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे. एकीकडे निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे गटाने यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देईल असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी येथून उमेदवार जाहीर केला आहे.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आज सोशल मीडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्ली सोडण्यापूर्वी पूर्व परवानगीसाठी अटी लादू नयेत, अशी विनंती आपचे खासदार संजय सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला केली. ते म्हणाले की, ते राजकीय नेते असून निवडणुकीची वेळ आहे.