दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि त्याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीच्या टीमने हे धाडसत्र अवलंबले आहे.
किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग निदान झाल्याची माहिती बॅकिंघम पॅलेसने दिली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर दिली आहे.
देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. अशातच निवडणूक आयोगाने निवडणुकीआधी राजकीय पक्षांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज (6 फेब्रुवारी) विधानसभेत विधेयक मांडले जाणार आहे.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (S Somanath) यांनी बेंगळुरूमधील एशियानेट सुवर्णा न्यूजच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात उपस्थित व्यक्तींशी विविध विषयांवर चर्चा केली.
हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना विधानासभेत बहुमत सिद्ध करता आले आहे. यामुळे झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचे सरकार स्थापन होणार आहे.
मापुसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, “अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे गोबी मंचुरियनवर (Gobi Manchurian) बंदी घालण्यात आली आहे."
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “काशी व मथुरा ही मंदिरे शांतपणे मुक्त झाल्यास आम्ही इतर मंदिरांबाबत आग्रह धरणार नाही.
मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांनी 31 जानेवारी (2024) रात्री गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याने त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अझहरी यांना अटक केल्यानंतर समर्थकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स यांच्याकडून नुकतीच एक यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये इज्राइल देशाने भारताबद्दल काय मत व्यक्त केलेय याबद्दल सांगण्यात आले आहे.