पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.
एनडीए सरकारने 10 वर्षांमध्ये अन्नधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सरकारी खरेदी 761.40 वरून 1062.69 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मेट्रोचे नेटवर्क वाढले आहे. 9 वर्षांमध्ये 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्कचे जाळे पसरलं आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना भेटल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सरकारने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीतील देशाचा जीडीपी वाढीचा दर 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेची ही आकडेवारी पूर्नानुमानापेक्षा अधिक आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रिन्यूएबल एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक कोटी घरांवर सोलर पॅनल्स लावण्यासाठीच्या सब्सिडीच्या मदतीला मंजूरी दिली आहे.
तृणमूल काँग्रेस नेता शाहजहांला पोलिसांकडून आज 55 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अशातच शाहजहांच्या अटकेमुळे संदेशखळीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर 80 वर्षीय व्यक्तीला व्हील चेअर न दिल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.
टाडा कोर्टाकडून वर्ष 1993 मधील साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा आमदारांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पाठानिया यांनी केली आहे. खरंतर राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.