Crime News : कर्नाटकातील हुबळी येथे एका 20 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
Monsoon Update : हवामान खात्याने नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. कडाक्याच्या उन्हापासून लवकरच नागरिकांची सुटका होणार असून केरळात मॉन्सून कधी दाखल होणार याबद्दलचे अपडेट दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो झाला. घाटकोपर परिसरातून या रोड शो पार पडला. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झाली होती, तर पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला.
नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार आहे. नकली शिवसेना विलिन झाली की मला बाळासाहेबांची सर्वात जास्त आठवण येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
CAA लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच 14 लोकांना त्याचे फायदे दिले आहेत. गृह मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे, बुधवारी केंद्रीय गृह सचिवांनी 14 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील रॅलीत (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे स्क्रिप्ट लिहून इव्हेन्ट करणारे सेलिब्रेटी असल्याची बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधियांचं निधन झालं आहे. बुधवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावली.माधवीराजे नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या.मागच्या तीन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु.
इंडिया आघाडी लोकसभेत बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल असा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. त्याने या निवडणुकीत इंडिया आघाडी 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे.
गुगलच्या झालेल्या वार्षिक डेव्हलपर इव्हेंटमध्ये जेमिनी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारती नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले. तसेच यावेळी जिमिनी हे अँप आणि जेमिनी इन कॅमेरा आणि गुगल फोटोजची माहिती देण्यात आली.