कमर्शियल वापरात असलेल्या LPG सिलिंडरचे भाव कमी झाले असून ऑइल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात रेट कमी केले आहेत. भारतातील कोणत्या शहरात किती भाव आहे, ते आपण जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्यातील मतदान बाकी असताना एक चांगली बातमी आली आहे. मूडीजने जी २० राष्ट्रांमध्ये भारताचा सर्वात वेगाने वाढणारा देश म्हणून गौरव केला आहे.
Lok Sabha 7 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगड यांचा समावेश आहे.
नोएडामधील एका पॉश हायराईज सोसायटीमध्ये स्प्लिट एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली.याविषयी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितले की आग एका खोलीत लागल्याने आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
कर्नाटकचे आमदार आणि बलात्काराचा आरोप असलेले खासदार प्रज्वल रेवन्ना - जर्मनीहून परतताना बेंगळुरू विमानतळावरून आज पहाटे अटक करण्यात आली आहे - त्यांना 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ जूनला जेलमध्ये हजर व्हावे लागणार आहे. हजर होण्याच्या आधी त्यांनी भावनिक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडिया युझरने कमेंट केल्या आहेत.
जून महिना सुरु व्हायला आलेला असताना उन्हाळ्यातील गरमी थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस उकाडा आणि उष्णता वाढतच चालला आहे. बुधवारी ३० मे रोजी दिल्ली आणि राजस्थानमधील अनेक भागात 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. त्यांनी येथे जाऊन ध्यान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रज्वल रेवन्ना भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. बंगळूर विमानतळावरून SIT ने अटक केली असून त्याला न्य्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. त्याला १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचार कार्यात सर्वात जास्त धावपळ केली. त्यांनी प्रचाराच्या वेळेला २०० रॅली आणि जाहीर सभा, ८० मीडिया मुलाखती दिल्या. प्रचाराच्या काळात व्यस्त असताना मीडियाला पंतप्रधानांनी मुलाखत देण्यास प्राधान्य दिले.