भारताच्या लोकशाहीने 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. पीएम मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक शेजारी देशांच्या प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अद्याप कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच नागरिकांकडून पावसाच्या सरी कधी बरसणार याची वाट पाहिली जात आहे. पण यंदाच्या वर्षात भारतातील उन्हाच्या तापमानाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत,
इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाणार नाही यासंदर्भात नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. अशातच सोनिया गांधी यांनी म्हटले की, लोकशाहीत सत्ता नंबर्सच्या आधारावर मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जूनला पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. अशातच शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी सुरु करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंका आणि बांग्लादेशासह काही शेजारील देशातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवले आहे.
T20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि आयर्लंड यांच्यात चुरशीची लढत झाली. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारताला 97 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारतीय संघाने अवघ्या 12.2 षटकात पूर्ण केले आणि विजय मिळवला.
पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजपने सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली. त्यासाठी त्यांना एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची सोबत लागणार आहे.
राहुल गांधी यांना गुगल सर्चवर मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे. गुगल सर्चमध्ये भाजप काँग्रेसच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली असून मला यामधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.