‘द गार्डियन’ वृत्तपत्राने दावा केला होता की, भारतीय गुप्त एजेंसींनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात 20 दहशतवाद्यांची हत्या केली होती. या रिपोर्टवरच परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने स्पा सेंटर्समध्ये क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. क्रॉस जेंडर मसाजमध्ये महिलांकडून पुरुषाची आणि पुरुष मंडळी महिलांचे मसाज करतात.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळ्यासंदर्भात तुरुंगात आहेत. पण अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगातील लकी कार कुठेय तुम्हाला माहितेय का? खरंतर ही कार आम आदमी पक्षासाठी शुभ असल्याचे बोलले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखळीतील दोषींना तुरुंगात आयुष्य घालवावे लागेल असे विधान पश्चिम बंगालमधील जनसभेत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.
लग्नसोहळ्यासाठी वधूला आपल्या घरी नेण्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी वराकडून आणली जाते. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपार्यंत चिप्स-कुरकुरेची पाकीट लावलेली गाडी पोहोचल्याचे दिसून येत आहे.
कसं आपण तुझ्या बहिणीला फसवलं, आपला हात न कापता देखील आपण तिला कसं जीव द्यायला भाग पाडलं आणि हा सगळा आपल्याच डाव होता, हे विक्रांत लीला समोर कबूल करणार आहे जाणून घ्या आजच्या भागात काय होणार
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या वायनाड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नुकत्याच एका जनसभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुरेतील खासदार हेमा मालिनी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता भाजपसह कंगना राणौतने रणदीप सुरजेवाला यांना चांगलेच सुनावले आहे.
सध्या सोन्याच्या दाराने मोठी उच्चांकी घेतली आहे. १० ग्रॅम सोने ७०,७०० रुपयांवर गेले आहे. त्यामुळं पाढव्याच्या मुहूर्तावर खरेदीदारांची मागणी पाहता सोने ७२ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.