कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे.
उत्तरप्रदेशातील प्रचारावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना चांगलीच तंबी दिली असून समाजामध्ये काहीही अनुचित घडल्यास त्यांचा विनाश निश्चित असल्याचे सांगितले आहे. जाणून घ्या नेमके का बोले योगी आदित्यनाथ
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ग्वाल्हेर येथील पीएमएलए न्यायालयाने 1995 आणि 1997 च्या आर्म्स ऍक्ट प्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक अब्जाधीश ज्याचे वय 30 वर्षांखालील आहे त्यांनी प्रचंड वारशाने आपली संपत्ती कमावली आहे, असे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.
आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले आहेत, की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सध्याच्या परिस्थितीत पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती असून त्यांच्या उपस्थितीचा कॅडरवर "सकारात्मक परिणाम" झाला आहे.
नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने 15 मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून दररोज उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि भाजपही उमेदवारांची नावे निश्चित करण्याचा धडाका लावला आहे.
काँग्रेस पक्षाने शुक्रवारी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रदर्शित केला आहे. यामध्ये त्यांनी न्यायाचे पाच स्तंभ असा उल्लेख केला आहे.
पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण पीपीएफच्या योजनेत तुमचा फार मोठा फायदा होऊ शकतो.