पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अशातच लोकसभेच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा इटलीत असणार आहे. यासाठी आज पंतप्रधान रवाना होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. या दहशतवाद्यांबद्दल अधिक माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही दिले जाईल अशी घोषणाही करण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
Red Fort Attack Case: लाल किल्ला हल्ला प्रकरणात पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक दोषी
कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात किमान १० भारतीय आहेत. 5 जण केरळचे रहिवासी होते. या अपघातात 50 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 30 भारतीय आहेत.
तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, या पदावर त्यांची चौथी टर्म होती. शपथविधी समारंभानंतर चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी मिठीची देवाणघेवाण केली.
लोकसभा निवडणुकीनंतर सीआयडी सक्रिय झाली आहे. लैंगिक छळ प्रकरणी CID ने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना नोटीस बजावली आहे. CID ने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना समन्स बजावले आहे.
52 वर्षीय मोहन चरण माझी आज संध्याकाळी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
चंद्राबाबू नायडू हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्यांच्या कंपनीचा शेअर आज वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. Heritage Foods Limited या कंपनीचा शेअर वाढणार आहे.
टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज सकाळी 11.27 वाजता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यालागृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.