Secound Phase Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 13 राज्यांसह 89 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, त्रिपुरासह मणिपुरमधील एक भाग मणिपुरच्या बाहेरील जागेचा समावेश आहे. दरम्यान, वर्ष 2019 मध्ये याच 88 जागांपैकी 52 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. याशिवाय काँग्रेसला 18 आणि शिवसेना व जेडीयूला चार-चार जागांवर विजय मिळवता आला होता. या व्यतिरिक्त 10 जागा अन्य खात्यात केल्या होत्या.