अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प मांडणार असून समाजातील सर्वच वर्गाला यामधून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी कर सवलत देण्यात येईल, अशीही आशा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासात काही अर्थसंकल्प खूप महत्त्वाचे मानले जातात. 1947: स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला. 1957-58: टीटी कृष्णमाचारी यांनी मालमत्ता करासह अनेक कर सुधारणा केल्या.
Neet Paper Leak Scam : आयआयटी दिल्लीच्या संचालकांनी तज्ञांचे पॅनेल तयार करुन मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कळवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा यांनी हरियाणा सरकारच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र विरोध केला आहे.
Economic survey 2023-24 : 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण सादर होणार असून, त्यात देशाचे आर्थिक चित्र पाहायला मिळणार आहे. भविष्यातील योजनाही या अहवालात पाहायला मिळतील.
सोमवारी सुप्रीम कोर्टात NEET UG 2024 पेपर लीक प्रकरणी याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी परीक्षा रद्द करण्याची विनंती केली. सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी नमूद केले की पेपर लीक 4 मेपूर्वीच झाला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक सर्वेक्षणात 13 प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यात अर्थव्यवस्थेची स्थिती, आर्थिक व्यवस्थापन, किमती आणि चलनवाढ, विकासाची दृष्टी समावेश आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 जुलैला संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात सरकारचे संपूर्ण लक्ष खाजगी क्षेत्र आणि पीपीपीवर आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देश किती वेगाने प्रगती करेल हे देखील या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये कंवर यात्रेच्या मार्गावरील दुकानदार आणि भोजनालय मालकांनी त्यांच्या नावासह इतर तपशील प्रदर्शित करणे अनिवार्य केले होते.
Parliament Session Economic Survey 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी NEET परीक्षेबाबत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी NEET तसेच परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, ज्याला शिक्षणमंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले.