मोदी हे हितसंबंधापेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणारे नेते, मिलिंद देवरांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

| Published : May 13 2024, 03:35 PM IST / Updated: May 13 2024, 04:00 PM IST

milind deora
मोदी हे हितसंबंधापेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणारे नेते, मिलिंद देवरांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते दिवंगत मुरली देवरा यांच्याशी चांगले संबंध होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, दिवंगत प्रमोद महाजन यांच्या अंत्यसंस्कारात देवरा यांना मोदींना स्टेजवर भेटले, तेव्हा नरेंद्र मोदीजी माझ्या समोर बसले होते, आणि मी त्यांना अभिवादन केले. ते मागे वळले आणि विचारले, 'मिलिंद भाई, कसे आहात?' मला आश्चर्य वाटले, कारण मी राजकारणात अगदी नवीन होतो आणि मी फक्त 27 वर्षांचा नवखा होतो. फार कमी लोकांनी मला ओळखायचे. त्यावेळी मला मोदींचा असलेले वैयक्तिक संपर्क आणि ग्राउंड नॉलेज पाहून मी आश्चर्यचकित झालो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन आणि सर्वांना आदर देतात. असाच एक प्रसंग होता ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमादरम्यानचा, ज्याची पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन कबुली दिली आहे. भारत-अमेरिका संबंध वाढवण्यासाठी माझे वडील दिवंगत मुरली देवरा यांचे योगदान होते. यांची मोदींनी 'माझा मित्र मुरली देवरा आज खरोखरच खूश असेल' ट्विट करुन कबुली दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय हितसंबंधांवर उठून राष्ट्राला प्राधान्य देणारे नेते आहेत. असेही राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.