Mobile addiction: सोशल मीडियावर बंदी येणार? मद्रास हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
Mobile addiction : स्मार्टफोन हाती आल्यापासून प्रत्येकजण त्यात गढून गेल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या व्यसनामुळे आजची तरुण पिढी बरबाद होत आहे. म्हणूनच त्यावर बंदी घालण्याची सूचना थेट मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे.

भारतात सोशल मीडियावर बंदी घालण्याची मागणी
आजकाल लहान-मोठे सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. मुलांपर्यंत अश्लील मजकूर पोहोचत असल्याने मद्रास हायकोर्टाने चिंता व्यक्त करत यावर बंदी घालण्याची सूचना केली आहे.
इंटरनेटवर निर्बंध येणार का?
स्मार्टफोनमुळे मुले मोबाइलचे व्यसनी बनत आहेत. त्यांना अश्लील मजकुरापासून वाचवण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
सोशल मीडियावर मद्रास हायकोर्टाची टिप्पणी...
मद्रास हायकोर्टासमोर मुलांच्या इंटरनेट वापरासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी का नाही, असा सवाल कोर्टाने केला आहे.
सोशल मीडियावर बंदी येणार का?
आता न्यायालयानेही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यास सांगितले आहे. सरकारने काही वेबसाइट्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. मद्रास हायकोर्टाच्या सूचनेनंतर आता कठोर पावले उचलली जाऊ शकतात.
