महाकुंभ 2025: त्रिवेणी संगमात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे पवित्र स्नान
- FB
- TW
- Linkdin
२ फेब्रुवारी रोजी सकाळी, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरापासून ८०० मीटर अंतरावर असलेल्या नागवासुकि घाटावर, परदेशातून आलेल्या भाविकांसह गंगास्नान केले. त्यानंतर सतुवा बाबांच्या आश्रमात जाऊन, बाबांची भेट घेतली आणि आध्यात्मिक चर्चा केली. यावेळी सेक्टर ८, बजरंग दास मार्गावरील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरात रुद्रपूजा आणि गणेश होम आयोजित करण्यात आला होता आणि भाविकांनी यात श्रद्धेने सहभाग घेतला.
गुरुदेवांनी स्वामी अवधानंद गिरी यांच्या आश्रमात भेट देऊन, त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली. त्यानंतर दिगंबर अखाड्यातील साधुसंतांची भेट घेतली.
गुरुदेवांच्या वतीने श्री श्री तत्त्व भंडाराचे आयोजन करण्यात आले असून, विविध साधुसंतांना दहा टन अन्नधान्य दिले. त्यात बिस्किटे, तूप, सोयाबीन इत्यादी खाद्यपदार्थ समाविष्ट होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरात दररोज भंडारा चालू असून, येणाऱ्या भाविकांना अन्नदान केले जात आहे.
महाकुंभमेळा हा आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृतीचा भव्य संगम आहे, यावर्षी त्यात आणखी एक विशेष बाब जोडली गेली. आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या 'महाकुंभातून गुरुदेवांसोबत ध्यान करा' या कार्यक्रमात हजारो साधक सहभागी झाले. मंगळवारी संध्याकाळी जागतिक आध्यात्मिक गुरू, मानवतावादी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी सत्संग घेतला. या सत्संगात हजारो भाविकांसह संतही भक्ती संगीतात आणि ज्ञानात रममाण झाले.
वसंत पंचमीच्या दिवशी हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले. माध्यमांशी बोलताना गुरुदेव म्हणाले, "हा कुंभमेळा एक अद्भुत अनुभव आहे. प्रत्येकाच्या आध्यात्मिक चेतना जागृत करण्याची ही एक उत्तम संधी आहे. वेगवेगळ्या परंपरा आणि श्रद्धा पाळत असतानाही, सर्वजण एकत्र येऊन पूजाअर्चा करू शकतात हे ते दाखवते. आज जगात धर्म आणि श्रद्धांमध्ये संघर्ष सुरू असताना, ते सर्वजण येथे येऊन विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण पहावे."
कुंभ पर्वाचा सार म्हणजे तुमच्या आतील पूर्णत्व जाणून घेणे. ज्ञान, भक्ती आणि कर्म एकत्र आले कीच हे शक्य होते. येथे वाहणारी गंगा ही ज्ञानाचे प्रतीक आहे, तर यमुना भक्तीचे आणि अदृश्य सरस्वती कर्माचे प्रतीक आहे."
गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली हा एक परिवर्तनकारी अनुभव होता. यामुळे ऐक्याचा, शांतीचा, मानवतेला करुणेचा संदेश गेला. गुरुदेव म्हणाले, "गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम हा इडा, पिंगळा आणि सुषुम्ना शक्ती नाड्या दर्शवतो. ध्यानात आपण स्थिर झाल्यावर अमरत्वाचा अमृत अनुभवतो."
महाकुंभात चालू असलेली सेवा कार्ये. महाकुंभात आर्ट ऑफ लिव्हिंग अनेक सेवा कार्ये करत आहे. मोफत अन्न, आयुर्वेदिक उपचार आणि भाविकांच्या कल्याणाची सेवा २५ सेक्टरमध्ये चालवत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरात दररोज एक टन खिचडी दोन वेळा बनवून, २५,०००-३०,००० भाविकांना वाटली जात आहे. यासोबत श्री श्री तत्त्वाच्या आठ तज्ज्ञ नाडी वैद्यांनी ५००० लोकांची नाडीपरीक्षा करून, आयुर्वेदिक सल्ला दिला.
संध्याकाळी वसंत पंचमीच्या दिवशी झालेल्या सत्संगात गुरुदेवांनी सर्वांना ध्यान करून दिले. ४ फेब्रुवारी रोजी गुरुदेव श्री श्री रविशंकर प्रयागराजहून १८० देशांतील कोट्यवधी भाविकांना ऑनलाइन ध्यान करून देणार आहेत.