कुत्र्याला दुःखी पाहून 2 बहिणींची आत्महत्या, लखनौमधील धक्कादायक घटना!
Lucknow News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल. येथे, पाळीव कुत्र्याच्या आजारपणामुळे दोन बहिणी इतक्या निराश झाल्या की त्यांनी आत्महत्या केली.

एका कुत्र्याच्या दुःखात 2 बहिणींनी दिला जीव
अनेक लोक कुत्रा पाळतात, कारण तो माणसाचा सर्वात विश्वासू प्राणी आहे. पण विचार करा, कुणी कुत्र्यावर इतके प्रेम करू शकते का की त्याच्यासाठी आपला जीव देईल. असेच एक दुःखद प्रकरण उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधून समोर आले आहे. येथे दोन बहिणींनी आपल्या पाळीव कुत्र्याच्या दुःखात आणि त्याच्या वियोगामुळे आपला जीव दिला.
(प्रातिनिधिक फोटो)
लखनौमधील एक अजब-गजब प्रकरण
हे विचित्र प्रकरण लखनौच्या पारा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी राधा (24) आणि जिया (22) यांनी एकत्र विष पिऊन आत्महत्या केली. कारण त्यांचा टोनी नावाचा जर्मन शेफर्ड आजारी राहू लागला होता. त्यानंतर दोन्ही बहिणी उदास राहू लागल्या. त्यांना वाटले की तोही गेला तर त्या त्याच्याशिवाय काय करतील, याच कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
(प्रातिनिधिक फोटो)
भावाचा मृत्यू आणि आजारी वडिलांमुळे त्या खचल्या होत्या
सांगितले जाते की, तो कुत्रा त्यांच्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा होता. कारण वडील सहा महिन्यांपासून गंभीर आजारी आहेत, तर लहान भावाचा ब्रेन हॅमरेजमुळे आधीच मृत्यू झाला होता. या दुःखांमुळे त्या नैराश्यात जाऊ लागल्या होत्या. वडिलांच्या उपचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण त्यांनी जर्मन शेफर्डला पाळले आणि हळूहळू त्या सावरू लागल्या. याच कुत्र्यामुळे त्यांचे सर्व टेन्शन दूर होत असे.
(प्रातिनिधिक फोटो)
दोन्ही बहिणींना टोनीचे दुःख पाहिले जात नव्हते
एके दिवशी त्यांच्या कुत्र्याची प्रकृती अचानक बिघडली, तेव्हा त्यांनी त्याच्यावर उपचार केले, पण त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. त्याने खाणे-पिणेही बंद केले होते. दोन्ही बहिणींना टोनीचे दुःख सहन होत नव्हते. त्यांना वाटू लागले की, जो कुत्रा आम्हाला थोडेफार सुख देत होता, तोही आता आम्हाला सोडून जाईल, तर आम्ही जगून काय करणार? त्या इतक्या नैराश्यात गेल्या की त्यांनी एकत्र फिनाईल पिऊन आत्महत्या केली.
(प्रातिनिधिक फोटो)
आईला बोललेले शेवटचे शब्द तुम्हाला रडवतील
मीडिया रिपोर्टनुसार, विष प्यायल्यानंतर दोन्ही बहिणींना वेदना होऊ लागल्या आणि त्या तडफडू लागल्या, तेव्हा त्यांनी आईला सांगितले - 'आई, आम्ही दोघींनी फिनाईल प्यायले आहे. आमच्यानंतर टोनीला घरातून काढू नकोस, त्याचे उपचार सुरू ठेव. आम्ही त्याला या अवस्थेत पाहू शकत नाही.'
(प्रातिनिधिक फोटो)

