05:12 PM (IST) Apr 19
पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण

देशातील 102 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही नागरिक मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर उभे असून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी दिली जात आहे. याशिवाय मणिपूर येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याने तीन जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथील मतदान केंद्रावर दगडफेक झाली. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील मतदान केंद्रावर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

04:55 PM (IST) Apr 19
तमिळनाडूत दुपारी 3 वाजेपर्यंत 51.41 टक्के मतदान, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

तमिळनाडूत दुपारी 3 वाजेपर्यंत 51.41 टक्के मतदान झाले आहे. यापैकी सर्वाधिक मतदान धर्मपुरी येथे 57.86 टक्के, नमक्कल येथे 57.67 टक्के झाले आहे. चेन्नई मध्य येथे 41.47 टक्के, चेन्नई दक्षिण येथे 42.10 टक्के, चेन्नई उत्तर येथे 44.84 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू यांनी दिली आहे.

04:50 PM (IST) Apr 19
मणिपूरमधील इंफाल पूर्वमध्ये मतदान पूर्ण, ईवीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सील करण्याचे काम सुरू

मणिपूरमधील इंफाल पूर्वमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. येथे सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. आता मतदान केंद्रामधील ईवीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सील करण्याचे काम सुरू झाले आहे. 

04:23 PM (IST) Apr 19
तमिळनाडू येथे दुपारी 3 वाजेपर्यंत 45.3 टक्के मतदान

तमिळनाडू येथे दुपारी 3 वाजेपर्यंत 45.3 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 51.41 टक्के मतदारांनी तमिळनाडूत मतदान केले आहे.

04:16 PM (IST) Apr 19
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. 

  • नागपूर 40.10 टक्के
  • रामटेक 38.43 टक्के
  • चंद्रपूर 43.48 टक्के
  • भंडारा-गोंदिया 46 टक्के
  • गडचिरोली-चिमूर 55.79 टक्के
03:44 PM (IST) Apr 19
नारायण राणे यांचा निवडणुकीत विजय होईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले की, "मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होते. महायुतीतील नेतेमंडळीही उपस्थितीत होती. उमेदवारी अर्ज भरताना सर्वत्र उत्साह होता. मला विश्वास आहे, नारायण राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून विजय होईल."

03:16 PM (IST) Apr 19
जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका होतायात- ओमर अब्दुल्ला

ऑगस्ट 2019 नंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाने काश्मीरमधील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अशातच गृहमंत्री म्हणतायत आधी ते नागरिकांची मन जिंकतील आणि नंतर निवडणूक लढवतील. याचा अर्थ असा होतो की, त्यांना नागरिकांची मने जिंकता आली नाही असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

02:19 PM (IST) Apr 19
इंडिया आघाडीची जनतेत लाट - आरजेडी नेत्या मिसा भारती

बिहारमधील पटना येथील पाटलीपुत्रच्या आरजेडी पक्षाच्या नेत्या मिसा भारती यांनी म्हटले की, इंडिया आघाडीची लाट जनतेत आहे. आम्ही जनतेमध्ये गेलो असता त्यांनी एनडीएने आमच्यासाठी काहीही केले नसल्याचे सांगितले. एनडीए नेहमीच बेरोजगारी, शेतकऱ्यांना मिळणारी कमाई दुप्पट होईल असे म्हणतात पण खरंतर असे काहीही झालेले नाही.

02:07 PM (IST) Apr 19
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे अशी राजस्थानमधील जनतेची इच्छा - मुख्यमंत्री भजनलाल शर्मा

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी म्हटले की, आज 12 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे अशी इच्छा आहे. राजस्थानमधील सर्व 25 जागांवर भाजपचा विजय होईल असेही भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे.

01:45 PM (IST) Apr 19
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले मतदान

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राजस्थानमधील जयपुर येथे मतदान केले आहे.

01:38 PM (IST) Apr 19
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या उमेदवार इराक हसन यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या उमेदवार इराक हसन यांनी मतदान केले आहे. 

01:20 PM (IST) Apr 19
अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल डीके जोशी यांनी पोर्ट ब्लेअरमधील मतदान केंद्रावर केले मतदान

अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल डीके जोशी (निवृत्त) यांनी पोर्ट ब्लेअरमधील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

01:09 PM (IST) Apr 19
अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य सचिव केशव चंद्र यांनी पोर्ट ब्लेअर येथील मतदान केंद्रावर केले मतदान

अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य सचिव केशव चंद्र यांनी पोर्ट ब्लेअर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

12:51 PM (IST) Apr 19
उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बाबा रामदेव यांनी केले मतदान

उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बाबा रामदेव यांनी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी म्हटले की, “माझे मत भारताला आहे. माझे मत भारताला आजारमुक्त आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी आहे. मी भारतातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान केले आहे. मी मतदारांना आवाहन करतो की, घराबाहेर पडून मतदान करावे.”

12:48 PM (IST) Apr 19
केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे केले मतदान

केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे मतदान केले आहे. 

12:26 PM (IST) Apr 19
छत्तीसगढमधील बिजापूर येथे IED स्फोट, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट जखमी

छत्तीसगढमधील बिजापूर येथे आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला आहे. यावेळी इलेक्शन ड्युटीवर असलेले सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

12:10 PM (IST) Apr 19
मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी केले मतदान

मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मतदान केले आहे.

11:51 AM (IST) Apr 19
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारदरा येथे केले मतदान

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारदरा येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी म्हटले की, "पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदींचे इंजिन अपयशी झाले असून नागरिकांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हवेय. याशिवाय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यातील पाचही लोकसभेच्या जागांवर निवडून येतील."

11:45 AM (IST) Apr 19
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नागपुरात केले मतदान

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी महाराष्ट्रातील नागपुर येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

11:24 AM (IST) Apr 19
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात केले मतदान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदान केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. यामुळे प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन करतो."

Read more Articles on