सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित करुन ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. त्यामुळे सर्वच दिग्गज नेतेमंडळी प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात (Loksabha Election) तळ ठोकून आहे. महाराष्ट्रात 4 थ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान (Voting) होत असून देशभरातील विविध राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे, देशपातळीवरील नेतेही प्रचारसभांचे दौरे कर आहेत. पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारसभांची आकडेवारी पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सर्वाधिक सभा घेऊन रेकॉर्ड केला आहे. पहिल्या 3 टप्प्यात मोदींनी तब्बल 83 सभा घेतल्या आहेत. त्यामुळे प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर लागतो.

सर्वाधिक प्रचारसभा, 'रोड शो' करणारे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी 83

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 66

काँग्रेस नेते राहुल गांधी 40

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी 29

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शाह यांनी 66 सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये भाग घेतला आहे, याबाबत भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी 29 प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.

मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज

14 मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी १३ मे ला त्यांच्या विशाल 'रोड शो'चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार