- Home
- India
- King Cobra Attack : घराच्या अंगणात झाडावर दिसला कोब्रा, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर जिवघेणा हल्ला
King Cobra Attack : घराच्या अंगणात झाडावर दिसला कोब्रा, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर जिवघेणा हल्ला
कोब्रा या जातीच्या सापाला सापांचा राजा समजले जाते. तो भारतातील सर्वांत विषारी साप आहे. त्याच्या विषाचा एक थेंबही अनेक नागरिकांचा जीव घेऊ शकतो. या कोब्राने जर हल्ला केला तर... असेच काही उत्तराखंडमध्ये घडले आहे.

उत्तराखंडमधील डेराडून जिल्ह्यातील भावुवाला गावात एक थरारक घटना घडली. घराच्या अंगणातील झुडपात लपलेल्या एका प्रचंड नागराजाची (राजविंबाळा) माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचले. मात्र, भिंतीवर पसरलेल्या वेलींमध्ये लपलेल्या या प्रचंड नागराजाला शोधणे कठीण झाले. जेव्हा वेल कापण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा साधारण माणसाच्या दुप्पट आकाराचा मोठा नागराज अचानक डोकं वर काढून अधिकाऱ्यांवर झेपावला. हा क्षण पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
ही घटना झाझरा रेंज, डेराडून फॉरेस्ट डिव्हिजन येथे घडली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. व्हिडिओत दिसते की अधिकारी साप खाली आणण्याचा प्रयत्न करत असताना तो अचानक पुढे झेपावतो. एक अधिकारी खाली पडतो, तर दुसरा वेळेत मागे हटतो. आसपास इतर लोकही उभे होते. लोकांनी विचारणा केली की असा धोकादायक साप पकडण्याचा हा मार्ग खरोखर शास्त्रीय आहे का?
शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर साप खाली आणण्यात यश आले आणि त्यावेळी त्याचा प्रचंड आकार स्पष्ट दिसला – जवळपास १८ फूट लांबीचा प्रचंड नागराज! वनविभागाने मात्र नंतर माहिती दिली की पकडलेला साप सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.
या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि एक्स (Twitter) वर प्रचंड व्हायरल झाला असून, वनअधिकाऱ्यांच्या निष्काळजी व अ-शास्त्रीय पद्धतीवर तीव्र चर्चा सुरू आहे.
पकड़ने गई वन विभाग की टीम पर किंग कोबरा का अटैक, बाल बाल बचे टीम के लोग, मुश्किल से किया काबू, रेस्क्यू कर जंगल में छोड़ा।
घटना देहरादून वन प्रभाग की झाझरा रेंज के भाऊवाला गांव की है। असाधारण लम्बाई वाले खतरनाक सांप को देखकर ग्रामीणों में हड़कंप मच गया था।#KingCobra#Dehradunpic.twitter.com/2Un4XeohqA— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) August 30, 2025

